-
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत तीन कोटींनी वाढ झाली आहे. त्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही.
-
एकूण मालमत्ता : सुमारे ७ कोटी ६६ लाख.
-
जंगम मालमत्ता : तीन कोटी ९६ लाख. यात गायकवाड यांची एक कोटी ९६ लाख, तर पतीची दोन कोटी १० लाख. यामध्ये १० तोळे सोन्याचे दागिने, बँकेतील ठेवी
-
स्थावर मालमत्ता : सुमारे तीन कोटी ७० लाख असून मावळ येथे ११ लाखांची शेतजमीन, अंजूर दिवे भिवंडी येथे एक कोटी ५४ लाखांचे गोदाम. मालाड मढ रोड आणि प्रतीक्षानगर येथील घरांचा समावेश.
-
कर्जे : वर्षा गायकवाड यांच्यावर एक कोटींचे कर्ज
-
उत्तर- मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
-
त्यांची लढत महायुतीचे उमेदवार ॲड. उज्वल निकम यांच्याशी होणार आहे.
-
उत्तर मध्य मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या पाच्यवा टप्प्यात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे.
-
(सर्व फोटो साभार वर्षा गायकवाड फेसबुक पेज)
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांची संपत्ती किती?
वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडील संपत्तीची माहिती दिली आहे.
Web Title: Affidavit info given to the election commission by the candidates of congress varsha gaikwad spl