• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. sanjay nirupam rejoin shivsena shinde group cm eknath shinde reaction after entry spl

संजय निरुपमांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत घरवापसी; एकनाथ शिंदे म्हणाले…

अखेर संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी संजय निरुपमांच्या समर्थकांनीही पक्षप्रवेश केला आहे.

May 4, 2024 12:23 IST
Follow Us
  • Sanjay nirupam joined shivsena again
    1/9

    काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील बाळासाहेब भवन येथे भेट घेतली होती.

  • 2/9

    संजय निरुपम हे मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून लोकसभा लढवण्याबाबत इच्छुक होते. मात्र, महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाकडे गेल्यामुळे त्यांनी याबाबत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच काँग्रेसच्या नेत्यांवर टीकाही केली होती.

  • 3/9

    मुख्यमंत्री शिंदे आणि संजय निरुपम यांच्यामध्ये काहीवेळ चर्चा झाली होती. या चर्चेनंतर संजय निरुपम हे शिवसेना शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली होती.

  • 4/9

    काँग्रेसने निरुपम यांना लोकसभेचं तिकीट नाकारल्यामुळे ते पक्षावर नाराज होते. तसेच त्यांनी पक्षाविरोधात वक्तव्ये केली होती. त्यामुळे पक्षाने गेल्या महिन्यात त्यांची हकालपट्टी केली होती.

  • 5/9

    दरम्यान निरुपम यांनी ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिंदे गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. काल (३ मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आहे.

  • 6/9

    निरुपम यांच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्टही केली आहे.

  • 7/9

    शिंदेंच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी निरुपम ताकद पणाला लावणार
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “२० वर्षांनी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये सक्रीय होत असल्याबद्दल संजय निरुपम यांचं आम्ही स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीत स्वतःहून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संपूर्ण ताकद पणाला लावण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.”

  • 8/9

    निरुपम यांच्याबरोबर मुंबई काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष जयप्रकाश सिंह, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस अंजय श्रीवास्तव, मुंबई काँग्रेस सहकार सेलचे अध्यक्ष दिलीप राजपुरोहित, मुंबई काँग्रेस सचिव फिरोज शाह, रश्मी मेस्त्री, विधीज्ञ प्रद्युम्न वाघमारे, आनंद त्रिपाठी, मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष सूरज गुप्ता, बाळा तिवारी, अरुण सुवर्णा, पाचुराम जयस्वाल, सर्वेश जयस्वाल, अमित कोचरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

  • 9/9

    सर्व फोटो एकनाथ शिंदे या फेसबुक खात्यावरून साभार.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha ElectionशिवसेनाShiv Senaसंजय निरुपम

Web Title: Sanjay nirupam rejoin shivsena shinde group cm eknath shinde reaction after entry spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.