-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले.
-
या फुटीमुळे त्यांच्यात कौटुंबिक कलही निर्माण झाला. या कौटुंबिक कलाहाचा परिणाम राज्याच्या राजकारणावरही होताना दिसतो.
-
अजित पवार आणि शरद पवार एकमेकांवर खुल्या व्यासपीठांवरून खुलेआम टीकाही करतात. या टीका कधी राजकीय असतात तर कधी वैयक्तिक.
-
आता अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांचा उल्लेख करून टीका केली आहे.
-
ठअजित पवार म्हणाले, “माझे वडील वारले तेव्हा मी आणि माझा भाऊ लहान होतो. त्यामुळे ते त्यांच्याकडे उपचार करायला गेले असतील. १९७५ साली माझे वडील वारले. तेव्हा मी दहावीत वगैरे असेन. तुम्ही दहावीत असताना तुमच्या वडिलांना तुमचे काका घेऊन गेले असतील तर काकांवर तेवढा विश्वास पाहिजे ना. आपण गैरविश्वास दाखवू शकतो का?”
-
“तिथे एकदा घरातील प्रमुख व्यक्तीने त्यांना नेलं आहे. मग त्यात १५ वर्षांच्या मुलाने लुडबूड करण्याची काय गरज? असा प्रश्न विचारत कोणत्या कामाकरता उपचार करायला बोलावलं होतं हे साहेबांनी सांगावं?” असाही सवाल त्यांनी विचारला.
-
तसंच, “कोणता आजार त्यांना झाला होता? कोणत्या आजाराकरता डॉक्टर किंवा कोणाकडून ट्रिटमेंट देत होतात हेही त्यांनी सांगावं”, असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.
-
(सर्व फोटो अजित पवार या फेसबुक पेजवरुन साभार.)
“माझे वडील वारले तेव्हा…” असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे शरद पवारांना थेट प्रश्न
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या वडिलांबद्दल शरद पवारांना काही प्रश्न विचारले आहेत.
Web Title: Ajit pawar on sharad pawar in latest speech ask him about fathers hospital details spl