• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. supriya sule latest news new post on social media about evm machine cctv footage spl

ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाचे सीसीटीव्ही बंद; सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर निवडणूक अधिकारी म्हणाले…

ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाचे सीसीटीव्ही बंद असल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप केला आहे. त्यासंबंधी एक पोस्टही त्यांनी लिहिली आहे.

May 14, 2024 13:11 IST
Follow Us
  • supriya sule latest news
    1/10

    बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोदामामधील सीसीटीव्ही प्रणाली ४५ मिनिटे बंद होती, असा दावा महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

  • 2/10

    त्यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.

  • 3/10

    ईव्हीएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटीव्ही बंद पडणं ही बाब संशयास्पद आहे, असे त्या म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

  • 4/10

    नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
    बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवल्या आहेत, तेथील सीसीटीव्ही कॅमेरे आज सकाळी ४५ मिनिटे बंद होते. ईव्हीएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटीव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसेच हा खूप मोठा हलगर्जीपणादेखील आहे. याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे आलेली नाहीत. तसेच या ठिकाणी टेक्निशियनदेखील उपलब्ध नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

  • 5/10

    पुढे बोलताना या घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही सुळेंनी केली.

  • 6/10

    आमच्या प्रतिनिधींना ईव्हीएमच्या स्थितीची पाहणीदेखील करु दिली जात नाही. हे अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटीव्ही का बंद पडला, याची कारणे जाहीर करावी. याखेरीज संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.

  • 7/10

    निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण :
    दरम्यान, याप्रकरणी आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

  • 8/10

    “कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान झालेली मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असून इलेक्ट्रेशियन काम करत असताना त्याने एक वायर काढलेली असल्याने दूरचित्रवाणीच्या पडद्यावर चित्रिकरण काही वेळ दिसत नव्हते. मात्र याबाबत तातडीने चौकशी करून संबंधित यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे,” असे त्या म्हणाल्या.

  • 9/10

    (सर्व फोटो सुप्रिया सुळे फेसबुक पेजवरून साभार.)

  • 10/10

    हेही पहा- उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाहीर आव्हान! म्हणाले, “आपण एक तारीख ठरवून…… 

TOPICS
निवडणूक आयोगElection CommissionबारामतीBaramatiमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionसुप्रिया सुळेSupriya Sule

Web Title: Supriya sule latest news new post on social media about evm machine cctv footage spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.