• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. devendra fadanvis latest interview to loksatta loksamvad said about mahayutis vidhansabha formula spl

महायुतीचा विधानसभेचा फॉर्म्युला ते मुख्यमंत्रीपदी कोण? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

लोकसत्ता लोकसंवाद या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या विधानसभेतील वाटचालीवर भाष्य केलंय.

May 19, 2024 10:51 IST
Follow Us
  •  devendra fadnavis latest news
    1/10

    सध्या लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना दुसरीकडे राज्याला विधानसभा निवडणुकीचेही वेध लागले आहेत.

  • 2/10

    ४ जून रोजी केंद्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर लागलीच विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

  • 3/10

    त्यामुळे विधानसभेच्या निमित्ताने राज्यात नवं समीकरण पाहायला मिळेल की जुनंच सरकार सत्तेवर बसेल, यावर चर्चा रंगल्या आहेत.

  • 4/10

    तसंच, नव्या पर्वाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला काय असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे.

  • 5/10

    यावर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. ते लोकसत्ताने आयोजित केलेल्या लोकसंवाद कार्यक्रमात बोलत होते.

  • 6/10

    गेल्या वेळी राज्यात भाजपा-शिवसेना युतीने ४१ जागा जिंकल्या होत्या. यंदा महायुती तेवढ्या जागा निश्चित जिंकेल”, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

  • 7/10

    “भाजपाला केंद्रात पुन्हा सत्ता मिळाल्यावर मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडले जाईल, अशी उगाचच चर्चा केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि अन्य मित्रपक्ष महायुती म्हणूनच एकत्रित लढू अशी ग्वाही देतो.” असं फडणवीसांनी सांगितलं.

  • 8/10

    भाजपाच्या शत-प्रतिशत नाऱ्याचे काय झाले या प्रश्नावर, “जेव्हा केव्हा आम्हाला ५१ टक्के मते मिळण्याची खात्री होईल तेव्हाच आम्ही तसा विचार करू. ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे”, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

  • 9/10

    जागावाटपात लोकसभेची भरपाई विधानसभेच्या वेळी केली जाईल, असे राष्ट्रवादीचे नेते दावा करीत आहेत याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले, “लोकसभेच्या जागावाटपाच्या वेळी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला जागा सोडताना अडचणी येतील, याची त्यांना कल्पना देण्यात आली होती. विधानसभेच्या वेळीही जागावाटपात मित्रपक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल. मात्र ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांचाच मुख्यमंत्री होईल, असे सूत्र असेलच, हे सांगता येणार नाही.

  • 10/10

    आताही भाजपाचे ११५ आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

TOPICS
देवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsमहायुतीMahayutiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Devendra fadanvis latest interview to loksatta loksamvad said about mahayutis vidhansabha formula spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.