• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. sharad pawar bkc speech news reply to pm narendra modi in mva sabha at mumbai spl

बीकेसीतील सभेतून शरद पवारांनी दिलं मोदींना प्रत्युत्तर; म्हणाले “हा भटकता आत्मा….”

१७ मे रोजी मुंबईमध्ये मविआचीही बीकेसी मैदानावर सभा झाली. या सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. (सर्व फोटो शरद पवार आणि शिवसेना या फेसबुक पेजवरुन साभार.)

Updated: May 19, 2024 13:41 IST
Follow Us
  • sharad pawar on narendra modi
    1/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरून हटविल्याशिवाय हा भटकता आत्मा स्वस्थ बसणार नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना दिले.

  • 2/10

    लोकांचा सहभाग असलेल्या या निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ असून, हुकूमशाहचा पराभव करून संविधान व लोकशाही वाचविण्याचा निर्धार इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला.

  • 3/10

    वांद्रे-कुर्ला संकुल मैदानावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात आली आहे होती.

  • 4/10

    सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदी नेते उपस्थित होते.

  • 5/10

    महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

  • 6/10

    ४ जूनला भाजपचा पराभव अटळ असल्याचा सूर सर्वच नेत्यांनी आळवला.

  • 7/10

    मुंबईतील ही निवडणूक प्रचाराची सभा इंडिया आघाडीच्या विजयाची नांदी ठरणारी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी या विराट सभेचे वर्णन केले.

  • 8/10

    काही दिवसांर्पू्वी भटकती आत्मा अशी मोदींनी पवारांवर टीका केली होता. त्याला पवारांनी प्रचाराच्या अखेरीस उत्तर दिले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्यांचे, लोकशाहीचे भवितव्य ठरविणारी ही निवडणूक आहे. सत्ताबदल केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

  • 9/10

    नरेंद मोदींनी चारसो पारची घोषणा दिली आहे, परंतु भाजप दोनशे पारही करणार नाही, देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार, असा विश्वास खरगे यांनी व्यक्त केला.

  • 10/10

    हेही पहा- उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल! पंतप्रधान मोदी मुंबईतील भाषणात काय म्हणाले…

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionशरद पवारSharad Pawar

Web Title: Sharad pawar bkc speech news reply to pm narendra modi in mva sabha at mumbai spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.