Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. pm narendra modi and rahul gandhi slams each other party in delhi election rallies spl

दिल्लीतील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल; राहुल गांधींचाही पलटवार म्हणाले “आमचं सरकार आल्यानंतर…”

दिल्लीमध्ये प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एकमेकांवर टीका केली.

May 20, 2024 15:19 IST
Follow Us
  • PM Modi Delhi
    1/11

    ईशान्य दिल्लीतील एका प्रचारसभेला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी इंडिया आघाडीची खिल्ली उडवली होती आणि ते म्हणाले होते की “जे लोक भ्रष्टाचार रोखण्यासाठी आले होते, त्यांनाच आता हजारो कोटींच्या घोटाळ्यांसाठी तुरुंगवास होत आहेत. (Express Photo by Tashi Tobgyal)

  • 2/11

    यावेळी पंतप्रधान मोदींनी नवीन संसद भवन आणि शहिद सैनिकांसाठी निर्माण केलेल्या स्मारकाचा दाखला देत सांगितले की ते लोकशाहीसाठी जगतात आणि कठोर परिश्रम करतात. (Express Photo by Tashi Tobgyal)

  • 3/11

    मोदींनी पुढे भाषणात सांगितले की जर त्यांचा कोणी वारस असेल तर ते १४० कोटी भारतीय आहेत ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले आहे. (Express Photo by Tashi Tobgyal)

  • 4/11

    सीएए लागू झाल्यानंतर २०२० च्या दिल्ली दंगलीसाठीही मोदींनी विरोधकांना दोष दिला आणि नमूद केले की “शेजारील देशांमध्ये अत्याचार झालेल्या अनेक लोकांना याच कायद्यानुसार नागरिकत्व देण्यात आले आहे.” (Express Photo by Tashi Tobgyal)

  • 5/11

    दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर एका सभेला संबोधित केले, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या तसेच आपच्या कार्यकर्त्यांना एकत्र काम करण्याचे आणि सर्व सात लोकसभा जागांवर त्यांच्या आघाडीचा विजय सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीकाही केली. (Express Photo by Abhinav Saha)

  • 6/11

    राहुल गांधींनी असाही दावा केला की मोदी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत, पंतप्रधान त्यांच्या उद्योगपतींशी असलेल्या संबंधांवर बोलत नाहीत तसेच निवडणूक रोख्यांचा दुरुपयोग कसा केला याबद्दल काही स्पष्ट करत नाहीत. (Express Photo by Abhinav Saha)

  • 7/11

    राहुल गांधी म्हणाले की, “संविधानाला धोका निर्माण करणाऱ्यांपासून संविधान वाचवणे हे इंडिया आघाडीचे पहिले उद्दिष्ट आहे.” यावेळी त्यांनी त्यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा संदर्भ दिला. (Express Photo by Abhinav Saha)

  • 8/11

    काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या पुढील वाटचालीवर बोलताना गांधी म्हणाले, “आमचं सरकार आल्यानंतर आम्ही अग्निवीर योजना कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून देऊ, जीएसटी सुलभता आणु आणि मोठ्या उद्योगपतींऐवजी छोट्या व्यावसायिकांना मदत करू.” (Express Photo by Abhinav Saha)

  • 9/11

    गांधींनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली आणि आरोप केला की माध्यमं मोदींच्या २-३ उद्योगपती मित्रांचे झाले आहेत. ते एकतर अंबानींच्या घरचे विवाहसोहळे दाखवतात, बॉलीवूड कलाकारांना किंवा नरेंद्र मोदींना ते त्यांच्या चॅनेल्सवर चोवीस तास दाखवत असतात. (Express Photo by Abhinav Saha)

  • 10/11

    काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांवर गांधी म्हणाले की “त्यांच्यासाठी ते ठीक आहे. आम्हाला भ्याड नेते नकोत, आम्हाला ‘बब्बर शेर’ हवे आहेत. जे सीबीआय-ईडी कारवाईच्या भीतीने घाबरतात ते आम्हाला नको आहेत.” असे ते म्हणाले. (Express Photo by Abhinav Saha)

  • 11/11

    दिल्लीमध्ये २५ मे रोजी सहाव्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. (Express Photo by Tashi Tobgyal)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsराहुल गांधीRahul Gandhiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Pm narendra modi and rahul gandhi slams each other party in delhi election rallies spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.