• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. prime minister narendra modi who is the political heir lok sabha election politics gkt

Photo : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण? स्वत:च केलं जाहीर; म्हणाले…

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सध्या धामधूम जोरात सुरू आहे. या प्रचाराच्यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं चांगलंच राजकारण तापलं आहे.

May 24, 2024 21:19 IST
Follow Us
  • PM Narendra Modi
    1/9

    देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशात विविध ठिकाणी जाहीर सभा पार पडत आहेत.

  • 2/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बिहारमधील महाराजगंज येथील एका सभेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी राजकीय वारसाबद्दल मोठं विधान केलं.

  • 3/9

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठी भविष्यवाणी केली होती.

  • 4/9

    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या या विधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला.

  • 5/9

    या सर्व चर्चेनंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील महाराजगंज येथील प्रचाराच्या सभेत या संदर्भात मोठं भाष्य केलं.

  • 6/9

    “माझा उत्तराधिकारी कोणीही नाही, या देशातील जनताच माझी उत्तराधिकारी आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

  • 7/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राजकीय वारसासंदर्भात स्पष्टीकरण दिले. त्यामुळे विरोधकांनी सुरु केलेल्या या चर्चांवर आता पडदा पडला आहे.

  • 8/9

    दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील महाराजगंज येथील प्रचाराच्या सभेत काँग्रेससह इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

  • 9/9

    याबरोबरच ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर इंडिया आघाडीला मोठा धक्का बसेल, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी हल्लाबोल केला. (सर्व फोटो-पंतप्रधान नरेंद्र मोदी फेसबुक पेजवरून साभार)

TOPICS
पंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiभारतीय जनता पार्टीBJPलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Prime minister narendra modi who is the political heir lok sabha election politics gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.