-
देशात लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान शिल्लक आहे, एक जून रोजी मतदान होणार आहे.
-
या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वच दिग्गज नेत्यांनी आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रचारात उडी घेतली आहे.
-
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ओडिशामध्ये सहा जागांवर मतदान होणार आहे. त्याशिवाय ४२ विधानसभा मतदारसंघांमध्येही मतदान होणार आहे.
-
त्यामुळे भाजप आणि काँग्रेसचे प्रमुख नेते या आठवड्यात ओडिशामध्ये प्रचारसभा घेणार आहेत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ मे रोजी ओडिशाचा दौरा करणार असून तीन जाहीर सभांना संबोधित करतील.
-
त्यापूर्वी गृहमंत्री अमित शहा २८ मे रोजी सभा घेणार आहेत.
-
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे २९ मे रोजी सभा घेणार आहेत.
-
राहुल गांधी ३० मे रोजी जाहीर सभा घेणार आहेत.
-
४ जून रोजी देशातील सर्वच सात टप्प्यांच्या मतदानाची मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिलेली आहे. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यासाठी प्रचाराचा धडाका: पुढाऱ्यांनी काय केलीय तयारी; कोण कुठे घेणार सभा?
देशामध्ये शेवटच्या टप्प्याचे मतदान शिल्लक आहे, त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रचारसभांचे नियोजन केले आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
Web Title: All party leaders last campaign meeting for final 7th phase whats the release planning spl