Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. from saina nehwal to alia bhatts gangubai kathiyawadi and ajay devgan maidan this years real life film kpw

‘सायना’ ते ‘मैदान’! प्रेरणादायी कहाण्या झळकणार पडद्यावर

पहा कोणते आहेत सिनेमे

Updated: September 9, 2021 00:33 IST
Follow Us
  • 2020 या वर्षात करोनाचं संकट आणि लाकडाउन यामुळे अनेक सिनेमाचं चित्रीकरण थांबल. तसंच अनेक नवे प्रोजेक्ट रखडले. मात्र 2021 वर्षात परिस्थिती काहिशी सुधारल्याने अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. खास करुन सत्य कथांवर तसचं वास्तविक जीवनावर आधरित अनेक सिनेमा या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.यात सगळ्यात आधी परिणीती चोप्रोचा 'सायना' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 26 मार्चला 'सायना' प्रदर्शित होणार आहे. सायना नेहवालची बॅडमिंटनमधील उत्कृष्ट कामगिरी या सिनेमातून पाहायला मिळेल. (photo-instagram@parineetichopra)
    1/7

    2020 या वर्षात करोनाचं संकट आणि लाकडाउन यामुळे अनेक सिनेमाचं चित्रीकरण थांबल. तसंच अनेक नवे प्रोजेक्ट रखडले. मात्र 2021 वर्षात परिस्थिती काहिशी सुधारल्याने अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. खास करुन सत्य कथांवर तसचं वास्तविक जीवनावर आधरित अनेक सिनेमा या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.यात सगळ्यात आधी परिणीती चोप्रोचा 'सायना' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 26 मार्चला 'सायना' प्रदर्शित होणार आहे. सायना नेहवालची बॅडमिंटनमधील उत्कृष्ट कामगिरी या सिनेमातून पाहायला मिळेल. (photo-instagram@parineetichopra)

  • 2/7

    ‘गंगूबाई काठियावाडी’ – बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्ट ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या 30 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.कामाठिपुरा इथल्या वैश्या व्यवसायात दबदबा असलेल्या गंगूबाईचा संघर्षमय प्रवास या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. मात्र सध्या हा सिनेमा शीर्षकामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.(photo-instagram@aliabhatt)

  • 3/7

    थलायवी- तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत नेत्या जयललिता याची बायोपिक असलेल्या 'थलायवी' सिनेमात कंगना मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाचं चित्रीकरण आता पूर्णत्वाकडे आलं आहे. जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी कंगनाने २० किलो वजन वाढवलं होतं. 23 एप्रिलला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.(photo-instagram@kanganaranaut)

  • 4/7

    'मैदान' -1950 मधील फुटबॉल कोच सय्यद अब्दुल रहिम यांच्या आयुष्यावर आधरित 'मैदान' सिनेमा 2021 च्या दसऱ्याला रिलीज होणार आहे. फुलबॉलमधील एक उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून सय्यद अब्दुल रहिम यांची ख्याती होती. या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीचं या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय..(photo-instagram@ajaydevgn)

  • 5/7

    'शाब्बास मिट्ठू'- माजी महिला क्रिकेट मिताली राज हिच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. मिताली राजने वर्ल्ड कपमध्ये दोनदा महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व केलंय. या सिनेमात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या भूमिकेसाठी तापसीने खूप मेहनत घेतली आहे. 5 फेब्रुवारी 2021 ला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणांमुळे प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे..(photo-twitter@taapsee pannu)

  • 6/7

    .'भूज- द प्राइड ऑफ इंडिया' – 1971 सालातील भारत-पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांच्या जीवनावर आधारित या सिनेमाचं कथानक आहे. विजय कर्णिक यांनी 300 महिला गावकऱ्यांच्या मदतीने भूज इथं वायूसेनेसाठी एअरबेस तयार केलं होतं. या सिनेमात अजय देवगण विजय कर्णिक यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे.(photo-instagram@ajaydevgn)

  • 7/7

    शेरशहा- सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडावाणी यांचा 'शेरशहा' हा सिनेमा 2 जुलैला प्रदर्शित होणार आहे. 1999 मध्ये भारत पाकिस्तानमध्ये कारगील युद्धात बलिदान दिलेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची शौरगाथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. .(photo-instagram@sidmalhotra)

TOPICS
क्रीडाSportsबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood Newsसेलिब्रिटीelebrity

Web Title: From saina nehwal to alia bhatts gangubai kathiyawadi and ajay devgan maidan this years real life film kpw89

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.