-
अभिनेत्री शेरॉन स्टोन ही हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शेरॉन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मुलाखतींच्या माध्यमातून तिच्या जीवनात घडलेल्या वाईट प्रसंगांचा खुलासा करताना दिसते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या तिच्या पुस्तकात शेरॉनने एक धक्का दायक खूलासा केला आहे.
-
'द ब्यूटी ऑफ लिव्हिंग ट्वाइस' या पुस्तकात शेरॉनने तिच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल लिहीले आहे.
-
शेरॉनने लिहले की, तिचा आणि तिच्या लहान बहिणीचे लैंगिक शोषण हे तिच्या आजोबांकडूनच झाले आहे.
-
शेरॉन फक्त ११ वर्षांची होती, जेव्हा तिच्या आजोबांनी तिचे लैंगिक शोषण केले.
-
धक्कादायक गोष्ट म्हणजे, या सगळ्यात शेरॉनची आजी तिच्या आजोबांना मदत करत होती. शेरॉन आणि तिच्या बहिणीला त्यांची आजी आजोबांसोबत एका खोलीत बंद करून ठेवायची आणि बाहेरून दार लावून घ्यायची. त्यानंतर आजोबा त्यांचे शोषण करायचे.
-
शेरॉन १४ वर्षांची असताना तिच्या आजोबांचे निधन झाले.
-
"मी त्या कॉफिनमध्ये डोकावून पाहिले, मी त्यांना हलवून पाहिले आणि शेवटी त्यांचा मृत्यु झाल्याची मला खात्री झाली," असे शेरॉन म्हणाली.
-
शेरॉनचं 'द ब्यूटी ऑफ लिव्हिंग ट्वाइस' हे पुस्तक आज म्हणजे ३० मार्च रोजी प्रकाशित झालं आहे.
-
या पुस्तकात शेरॉनने तिच्या आयुष्यातील चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींचा खुलासा केला आहे.
-
शेरॉनचे हे पुस्तक प्रकाशित होताच, अॅमेझॉन वरील नंबर वन सेलिंग बूक ठरलेलं आहे. (All photo credit : sharon stone instagram)
लहानपणी आजोबांनीच केले होते लैंगिक शोषण, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Web Title: Hollywood actress sharon stone reveals she was sexually abused by her grandfather dcp