-
आपलं अस्तित्व आणि आपली ओळख ही नावात आहे. बऱ्याचदा एखाद्याच्या नावाचा अनेक जण चुकीचा उच्चार करतात. इंग्रजी नावातील स्पेलिंगवरूनही अनेकदा चुकीचं नाव उच्चारलं जातं. नुकतंच आमिरच्या लेकीने तिचं नाव इरा नसून आयरा असल्याचं स्पष्ट केलं आहे. असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांच्या नावाचा अनेकदा चुकीचा उच्चार केला गेला. किंवा नेमकं त्यांचं नाव काय उच्चारावं असा प्रश्न चाहत्यांना पडला. अशा सेलिब्रिटींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.ज्याचं नाव बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने उच्चारलं जातं.
-
आमिर खानची लेक इंग्रजीत तिचं नाव Ira khan लिहते. त्यामुळे तिला इरा म्हंटलं जात होतं. मात्र एक व्हिडीओ शेअर करत तिच्या नावाचा उच्चार नेमका कसा करायचा ते सांगितलं होतं. तर तिचं नाव इरा नसून eye-ra म्हणजेच आयरा आहे.
-
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दीपिका पादूकोणचं नाव देखील अनेकदा चुकीचं उच्चारलं जातं. दीपिकाचं आडनाव पादूकोण आहे. मात्र इंग्रजीत लिहताना (Padkuone) त्यात शेवची E असल्याने काही जण पादूकोणे असा तिच्या आडनावाचा उच्चार करतात.
-
अभिनेत्री कल्कि केकलांच्या नावाचा उच्चारही गेल्या अनेक वर्षांपासून कल्कि कोचलिन केला जात होता. इंग्रजीत ती तिचं नाव Kalki Koechlin असं लिहते. मात्र एका मुलाखतीत तिने स्पष्ट केलं की तिचं नाव कल्कि कोचलिन नसून कल्कि केकलां आहे.
-
दिशा पटानीचं नावही गोंधळात टाकणारं आहे. काही तिचं आडनाव पटानी असं उच्चारतात तर काही पटनी. मात्र बिग बॉसच्या शोमध्ये दिशाने तिच्या नावाचा योग्य उच्चार सांगितला होता. दिशाचं आडनाव paat-ni म्हणजेच पाटनी असं आहे.
-
तर सलमान खानमुळे चर्चेत आलेली यूलीया वंतूर हिच्या नावातही मोठा गोंधळ असल्याचं अनेकांना वाटतं. यूलीया तिचं नावं इंग्रजीत Iulia Vantur लिहते. त्यामुळे तिला लूलीया वंतूर असं सुरुवातीला बोललं जात. मात्र तिचं मूळ नाव यूलीया वंतूर असं आहे.
-
बाहूबली फेम अभिनेता राणा दग्गुबातीचं पहिलं नाव सोपं आहे. राणाचे अनेक चाहते आहेत,मात्र या चाहत्यांना त्याचं आडनाव नेमकं काय असा प्रश्न पडतो. कुणी ते डग्गुबत्ती असं म्हणतं तर कुणी दग्गुबती. एका मासिकामध्ये चुकीचं नाव लिहलं गेल्यानंतर राणाने त्याच्या नावाचा योग्य उच्चार सांगितला. त्याचं नाव राणा दग्गुबाती असं आहे. (all photo-instagram)
-
तर बॉलिवूडची क्विन कंगना रणौतचं आडनावही अनेक प्रकारे उच्चारलं जातं. कुणी तिचं आडनाव रनावत म्हणत तर कुणी रनौट.
आयरा खान ते दीपिका, या सेलिब्रिटींची नावं उच्चारताना होते ‘ही’ चूक!
Web Title: Bollywood celebrity names pronounce wrong from deepika padokone to kangana ranaut kpw