• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. who is actress meera chopra who receltly take corona vaccine through fake id what is reletion between priyanka chopra kpw

बनावट ओळखपत्र दाखवून लस घेणारी अभिनेत्री मीरा च्रोपा कोण?; प्रियांका चोप्रासोबत काय आहे नातं?

पहा फोटो

May 30, 2021 17:17 IST
Follow Us
  • दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री मीरा चोप्रा चांगलीच चर्चेत आली आहे. मीराने बनावट ओळखपत्र दाखवत ठाण्यात लस घेतल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलाय. ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रावर अभिनेत्री मीरा चोप्रा हिला शुक्रवारी लशीचा पहिला डोस देण्यात आल्याची बाब समोर आली.
    1/10

    दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री मीरा चोप्रा चांगलीच चर्चेत आली आहे. मीराने बनावट ओळखपत्र दाखवत ठाण्यात लस घेतल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलाय. ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रावर अभिनेत्री मीरा चोप्रा हिला शुक्रवारी लशीचा पहिला डोस देण्यात आल्याची बाब समोर आली.

  • 2/10

    मीराने लसीकरणावेळीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.त्यानंतर मात्र तिने सोशल मीडियावरील फोटो डिलीट केला. पालिकेच्या करोना रुग्णालयामध्ये पर्यवेक्षक असल्याचे बनावट ओळखपत्र तयार करून मीराने लस घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकारामुळे महापालिकेची लसीकरण मोहीम वादाच्या भोवऱ्यात सापडली आणि नवा वाद निर्माण झाला.

  • 3/10

    या संपूर्ण प्रकरणानंतर मीरा चोप्रो कोण अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान मीरा चोप्राने देखील सोशल मीडियावरू आता तिची बाजू मांडली आहे.

  • 4/10

    अभिनेत्री मीरा चोप्रा ही बॉलिवूडची देली गर्ल प्रियांका चोप्रा आणि अभिनेत्री परिणीती चोप्राची चुलत बहीण आहे. मात्र प्रियांका आणि परिणीतीप्रमाणे बॉलिवूडमध्ये तिला लोकप्रियता मिळाली नाही.

  • 5/10

    मीराने आजवर काही साऊथ सिनेमांमध्ये काम केलं आहे. एका तामिळ सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने काही तेलगू सिनेमांमध्ये देखील काम केलं. मीराने ‘गँग ऑफ घोस्ट’, ‘1920 लंडन’, ‘सेक्शन 375’ अशा काही मोजक्या बॉलिवूड सिनेमांध्ये काम केलं आहे.

  • 6/10

    मीरा चोप्रा बॉलिवूडमध्ये तिचं नशीब आजमवतेय. मात्र प्रियांका चोप्रामुळे बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याचा आरोप मीराने एका मुलाखतीत केला होता. एवढचं नाही तर त्यानंतर संघर्ष वाढला असल्याचं ती म्हणाली होती.

  • 7/10

    झूमला दिलेल्या एका मुलाखती मीरा म्हणाली, ” जेव्हा मी एखाद्या निर्मात्याकडे काम मागण्यासाठी जायचे तेव्ही मी प्रियांकाची बहिण असल्याने ते मला कास्ट करण्यास टाळाटाळ करायचे."

  • 8/10

    नुकत्याच आलेल्या ‘द टॅटू मर्डर’ या वेब सीरिजमध्ये मीरा चोप्रा मुख्य भूमिकेत झळकली होती. मात्र प्रेक्षकांची या वेब सीरिजला पसंती मिळाली नाही.

  • 9/10

    दरम्यान बनावट ओळपत्र दाखवत लस घेतल्याच्या आरोपावर मीराने स्पष्टीकरण दिलं आहे. ट्विटरवर एक पोस्ट तिने शेअर केलीय. यात तिने आपण कोणत्याही प्रकारचं खोटं ओळखपत्र दाखवलं नाही असं म्हणत आरोप नाकारले आहेत.

  • 10/10

    एक महिन्यापूसन लसीकरणासाठी अनेक लोकांची आपण मदत घेत असल्याचं ती म्हणाली. शिवाय तिने रीतसर रजिस्ट्रेशन केलं होतं. ओळखपत्र म्हणून तिथे आधार कार्ड जमा केल्याचं सांगितलं. शिवाय सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं ओळखपत्र आपलं नसल्याचं मीराने स्पष्ट केलंय. (all photo-instagram@meerachopra)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema

Web Title: Who is actress meera chopra who receltly take corona vaccine through fake id what is reletion between priyanka chopra kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.