Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kareena kapoor anushka sharma lara dutta bollywood actress yoga in pregnancy aad

अनुष्का शर्मा ते करीना कपूर या अभिनेत्रींनी गरोदरपणातही दिली योगाला पसंती!

बीटाउनमधील काही अभिनेत्रींनी तर गरोदरपणातही योगाची साथ न सोडता नियमित योगा करण्यास पसंती दिली.

June 21, 2021 08:05 IST
Follow Us
  • karrena-lapoor-anushka-sharma-soha-ali-khan-yoga-pregnancy
    1/11

    असं म्हटलं जातं की योगाने माणसाच्या शरीराला, मनाला आणि आत्म्याला उर्जा , ताकद आणि सौंदर्य प्रदान होते. दैनंदिन आयुष्यात योगा करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी योगाला पसंती देताना दिसतात. मात्र बीटाउनमधील काही अभिनेत्रींनी तर गरोदरपणातही योगाची साथ न सोडता नियमित योगा करण्यास पसंती दिली. गरोदरपणात योगासन करण्याचे महत्व या अभिनेत्रींनी पटवून देत अनेक महिलांना प्रोस्ताहन दिलंय. आज जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने आपण पाहणार आहोत कोण आहेत या अभिनेत्री ज्यांनी गरोदरपणातही योगाला महत्व दिलं.

  • 2/11

    अनुष्का शर्मा: अनुष्का शर्मा फिटनेस प्रेमी असून तिला योगा करायला जास्त आवडते. प्रेग्नंसीच्या वेळेसपण अनुष्काने योगा सुरु ठेवला होता. अनुष्काने शीर्षासन करतानाचा एक फोटो इनस्टाग्रामवर पोस्ट केली होता. कॅप्शनमध्ये ती म्हणाली, "मला आनंद होतोय कि मी प्रेग्नंसीच्या वेळेस पण योगा करु शकते. माझा नवरा आणि तज्ञांच्या सहाय्याने मला सगळी आसनं करायची परवानगी आहे."

  • 3/11

    करीना कपूर : बेबो म्हणजेच करीना कपूरदेखील जिमसोबतच कायम योगा करण्याला पसंती देते. तैमूरच्या जन्मानंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी पण तिने योगाचीच मदत घेतली होती. ती सांगते की फेल्क्सीबल बॉडी आणि ताजेपणा हवा असेल तर किमान १ तास तरी योगा केला पाहिजे.

  • 4/11

    सोहा अली खान: अभिनेत्री सोहा अली खान सोशल मीडीयावर सक्रिय आहे. सोहा योगाप्रेमी असून गरोदरपणातही सोहा योगा करत होती. सोहाने सांगितले की रुटिनमध्ये थोडासा बदल करावा लागला. मात्र योगा करण्यात जो आनंदना तो इतर कशातही नाही.

  • 5/11

    कलकी कोचलीन :कलकी प्रेग्नसीच्या सुरवातीला एका ट्रॅामा मध्ये होती आणि नंतर यातून बाहेर येण्यासाठी तीने प्रिनॅटल प्रेग्नसीला निवडले.

  • 6/11

    एमी जॅक्सन : बॉलिवूडमध्ये झळकलेली हॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सनने देखील प्रेग्नंसी मध्ये योगाच्या मदतीने ध्यान करण्यावर भर दिला होता. तिने इनस्टाग्रामवर ध्यान करतानाचे फोटो शेअर केले होते. . पोस्ट प्रेग्नंसी वजन कमी करण्यासाठी पण एमीने योगाचीच मदत घेतली होती.

  • 7/11

    लिसा हेडन: मॉडेल आणि अभिनेत्री लिसा हेडन लवकरच तिसऱ्यांदा आई होणार आहे. मात्र याआधी आई गरोदर असताना लिसाने योगाला पसंती दिली होती. लिसा सोशल मीडीयावर सक्रिय असुन तीने बरेच फिटनेस व्हिडीओ तीच्या इनस्टाग्रामवर शेअर देखील केले आहेत.

  • 8/11

    समीरा रेड्डी : समीरा रेड्डी ही हिंदी आणि तेलुगू सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. समीराला जेव्हा प्रिनॅटल योगा बद्दल कळले तेव्हा तिने ही माहिती इतरांसोबतही शेअर केली., त्याच बरोबर तिने सोशल मीडीयावर तिच्या व्हिडीओच्या मदतीने गरोदर पणातील विविध व्यायाम प्रकारांचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.

  • 9/11

    लारा दत्ता: लारा दत्ताने स्वत: योगा करण्यासोबतच इतर महिलांनादेखील योगा करण्यासाठी प्रोत्साहन दिले. गरोदरपणाततिने गर्भवती महिलांसाठी योग्य असेलेल्या आसनांची डीव्हिडी तयार करून अनेक महिलांना गरोदरपणातील माहिती दिली.

  • 10/11

    गीता बसरा : भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगची बायको गीता बसराने प्रेग्नसी काळात योगाची मदत घेतली. तिने इनस्टावर पोस्ट करुन सांगितले की कोविड काळात कोविडपासून बचावासाठी आणि क्रॅम्स, पाठदुखी सारखी दुखणी टाळण्यासाठी मी योगाची मदत घेतली.

  • 11/11

    सौम्या टंडन: 'भाभीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडनने देखील गरोदरपणात योगाला निवडले. सौम्या टंडन सोशल मीडीयावर सक्रिय असुन तिने प्रिनॅटल योगाचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी सिनेमाHindi Cinema

Web Title: Kareena kapoor anushka sharma lara dutta bollywood actress yoga in pregnancy aad

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.