-
देवदास: आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पारोचा ध्यास घेतलेला ‘देवदास’ दिलीप कुमार यांनी ज्या तन्मयतेने रंगवला त्याला खरोखरच तोड नाही. पारोच्या प्रेमात देवदासचे विझत जाणे त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावातून दाखवले. हा सिनेमा पाहताना आपण दिलीप कुमार यांना न पाहता देवदासलाच पाहतो आहोत असेच वाटते. हा सिनेमा एमएक्स प्लेअर, सोनी लिव्ह, तसचं अमेझॉन प्राइमवर पाहू शकता.(Photo-Indian Express)
-
कर्मा: 1986 साली आलेल्या दिलीप कुमार यांच्या कर्मा या सिनेमाने चाहत्यांची मोठी पसंती मिळवली होती. या सिनेमा देखील zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे.
-
मधुमती: दिलीप कुमार व वैजयंतीमा यांती मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा चांगलाच गाजला. १९५८ सालात आलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सिनेमाचा आनंद प्रेक्षक zee5, एमएक्स प्लेअर आणि जिओ सिनेमावर घेऊ शकतात. (Photo-Indian Express)
-
मुघल-ए-आझम: या सिनेमातील सलीम हा तर दिलीप कुमार यांनी अजरामर केला. zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा पाहू शकता. तसचं यूट्यूबवर देखील हा सिनेमा उपलब्ध आहे. (Photo-Indian Express)
-
राम और श्याम: १९६७ सालात आलेला दिलीप कुमार यांचा राम और श्याम सिनेमा 'सोनी लिव्ह' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तसचं जिओ सिनेमावर प्रेक्षक पाहू शकतात.(Photo-You Tube)
-
नया दौर: श्रीमंतांच्या वर्चस्वापुढे गरीबांचा लढा या सिनेमात पाहायला मिळा. या सिनेमाला चाहत्याची पसंती मिळाली. दिलीप कुमार यांचा 'नया दौर' हा सिनेमा एमएक्स प्लेअर, सोनी लिव्ह तसचं अमेझॉन प्राइमवर पाहू शकता. .(Photo-You Tube)
-
-
-
‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता दिलीप कुमार यांचे ‘हे’ सुपरहिट चित्रपट
दिलीप कुमार यांचे काही सुपरहिट ठरलेले चित्रपट विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर चाहत्यांसाठी उपलब्ध आहेत.
Web Title: Dilip kumar must watch movies on ott kpw