-
अभिनेत्री दिया मिर्झा गरोदर असून सध्या ती हा काळ एन्जॉय करतेय दिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतेच दियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हनीमुनचे काही जुने फोटो शेअर केले आहेत.
-
दिया मिर्झाने मालदीवचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. दिया मिर्झा पती वैभव रेखीसोब मालदीवमध्ये हनीमूनसाठी गेली होती. यावेळी सावत्र मुलगी समायरादेखील त्यांच्या सोबत होती.
-
हे फोटो शेअर करत दिया कॅप्शनमध्ये म्हणाली, "एकत्र व्यतीत केलेले कायम आठवणीत राहणारे जादूई क्षण"
-
१५ फेब्रुवारी २०२१ ला दियाने वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधली होती.
-
फेब्रुवारीत लग्नसोहळा पार पडल्यानंतर दोनच महिन्यांनी म्हणजेच एप्रिल महिन्यात दियाने ती आई होणार असल्याची बातमी शेअर केली होती.
-
२०१४ सालामध्ये दियाने बॉयफ्रेण्ड साहिल संघा सोबत लग्न केलं होतं. त्यानंतर २०१९ साली दियाने साहिलपासून विभक्त झाल्याची माहिली सोशल मीडियावरून दिली होती.(All Photo- instagram@diamirzaofficial)
गरोदर दिया मिर्झाने शेअर केले हनीमूनचे ‘ते’ जुने फोटो
दिया मिर्झा पती वैभव रेखीसोब मालदीवमध्ये हनीमूनसाठी गेली होती. यावेळी सावत्र मुलगी समायरादेखील त्यांच्या सोबत होती.
Web Title: Dia mirza share throwback honeymoon photos with husband vaibhav rekhi and step daughter from maldives kpw