-
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली यांची मुलगी वामिका सहा महिन्यांची झालीय. अनुष्का शर्माने मुलीच्या सहा महिन्यांच्या वाढदिवसानिमित्त वामिकाोबतचे काही क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
विराट आणि अनुष्काने वामिकासोबत एका पार्कमध्ये तिचा हा खास वाढदिवस साजरा केलाय.
-
अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अनुष्का पार्कमध्ये एका मॅटवर झोपल्याचं दिसतंय. तर वामिका तिच्या पोटावर झोपली. यात अनुष्का वामिकाला काहीतरी दाखवत असल्याचं लक्षात येतंय.
-
तर अनुष्काने विराट आणि वामिकाचा देखील एक गोड फोटो शेअर केलाय. यात विराट लाडक्या लेकीसोबत खेळताना दिसतोय.
-
हे फोटो शेअर करत अनुष्काने एक खास पोस्ट लिहिली आहे. "तिचं हास्य आमचं संपूर्ण जग बदलू शकतं. आम्हाला आशा आहे की तुम्ही जसं पाहता त्याप्रमाणेच आम्ही ते प्रेम देऊ शकू." असं म्हणत अनुष्काने मुलीला शुभेच्छआ दिल्या आहेत.
-
अनुष्काच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी कमेंट करत वामिकाला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
११ जानेवरी २०२१ साली विराट आणि अनुष्काच्या संसारात वामिकाने तिच्या चिमुकल्या पावलांनी एण्ट्री केली होती. विराट आणि अनुष्काने अद्याप त्यांच्या मुलीला मीडियासमोर आणलेलं नाही. (All Photo- instagram@anushkasharma)
सहा महिन्यांची झाली विरुष्काची लाडकी लेक ‘वामिका’; अनुष्का शर्माने शेअर केले सेलिब्रेशनचे क्यूट फोटो
अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली यांची मुलगी वामिका सहा महिन्यांची झालीय.
Web Title: Anushka shrma and virar kohli daughter vamika 6th month birthday celebration anushka share cute photo goes viral kpw