-
टीव्ही क्षेत्रातील हॉट मम्मी आणि 'कसौटी जिंदगी की' फेम श्वेता तिवारी सध्या तिच्या ट्रान्सफॉर्मेशननंतर तिच्या फिटनेसमुळे बरीच चर्चेत आलीय. श्वेता तिवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गेल्या अनेक दिवसांपासून तिचे ग्लॅमरस आणि स्मार्ट फोटोज शेअर करत आहे. नुकतंच तिने शेअर केलेले पिंक आउटफिटमधले ग्लॅमरस फोटोज पाहून चाहते पुरते घायाळ झाले आहेत.
-
श्वेताने 'कसौटी जिंदगी की' या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून 'प्रेरणा' बनून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. त्यानंतर आता सोशल मीडियावर आपल्या स्टाईलचा जलवा पसरवतेय.
-
श्वेता तिवारीने नुकतंच पिंक पिंक पॅंट सूटमध्ये लेटेस्ट फोटोशूट केलंय. तिच्या गुलाबी अंदाजातील हे फोटोज सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहेत.
-
या फोटोशूटमध्ये तिची जबरदस्त स्टाइल दिसून आली. या फोटोशूटवेळी तिच्या उभा राहण्याचा अंदाज काही औरच होता. या फोटोमध्ये ती कमालीचे पोज देताना दिसून आली.
-
श्वेता तिवारीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते तर पुरते घायाळा झाले आहेत. पण चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा तिच्या फोटोंवर कमेंट करत तिच्या लूकचं कौतुक केलंय. तिच्या या ब्यूटीफुल, गॉर्जियस आणि स्टनिंग फोटोजवर आतापर्यंत 73 हजार लाइक आणि 805 हजार कमेंट आले आहेत.
-
श्वेता तिवारी अलीकडेच टीव्ही शो 'मेरे डॅड की दुल्हन' मध्ये झळकली होती. लवकरच ती टीव्ही रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाड़ी 11' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
यापूर्वी श्वेता राहुल-दिशाच्या लग्नात एका सुंदर पर्पल साडीच्या लूकमध्ये दिसून आली होती.
‘कसौटी जिंदगी की’ फेम श्वेता तिवारीचा पिंक सूटमधला गुलाबी अंदाज; चाहते झाले घायाळ
नुकतंच श्वेता तिवारीने शेअर केलेले पिंक आउटफिटमधले ग्लॅमरस फोटोज पाहून चाहते पुरते घायाळ झाले आहेत. सेलिब्रिटींनी सुद्धा तिच्या फोटोंवर कमेंट करत तिच्या लूकचं कौतुक केलंय.
Web Title: Shweta tiwari flaunts her glamorous look in a pink pant suit prp