-
छोट्या पडद्यावर बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्या आदर्श सुनेची भूमिका साकारत. सासूबाईचे अत्याचार,कट करस्थानाला सहन करतात. खऱ्या आयुष्यात या सुना खूप धाडसी आहेत. दिव्यांक त्रिपाठी आणि श्वेता तिवारीने छोट्या पडद्यावर आदर्श सुनेची भूमिका साकारली आहे. साध्य या दोघी 'खतरों के खिलाड़ी ११'मध्ये स्टंट्स साठी चर्चेत आहे. टीव्हीवर आदर्श सुनेच्या भूमिका सकरणाऱ्या या दोघी 'खतरों के खिलाड़ी ११' शोमध्ये खतरनाक स्टंट्स करताना दिसत आहेत. मात्र दिव्यांक त्रिपाठी आणि श्वेता तिवारी ही पहिली अशी अभिनेत्री नाही ज्यानी खतरनाक स्टंट्स परफॉर्म केले आहेत. (Photos-Official Instagram account)
-
अनिता हसनंदनी- टीव्हीची लोकप्रिय खलनायिका म्हणून ओळखली जाणारी अनिताने 'खतरों के खिलाड़ी'च्या पहिल्या सीजनमध्ये भाग घेतला होता. या सीजनच सूत्रसंचालन खिलाडी कुमार अक्षयने केलं होतं. अनितान या सीजनमध्ये खतरनाक स्टंट्स परफॉर्म करताना दिसली होती.(Photos-Official Instagram account)
-
रुपाली गांगुली- 'अनुपमा' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली 'खतरों के खिलाड़ी'च्या दुसऱ्या सीजनमध्ये दिसली होती. जरी ती हा शो जिंकली नसली तरी ती कठीण स्टंट परफॉर्म करताना दिसली होती.(Photos-Official Instagram account)
-
पूजा गौर-'खतरों के खिलाड़ी'च्या ५ व्या सीजनमध्ये पूजा गौर सामील झाली होती. मात्र आपल्या भीतीवर ताबा न राहिल्याने ती शो मधून बाहेर पडली. या सीजनमध्ये पूजा बरोबर अभिनेत्री गौहर खान आणि देबिना बनर्जीने देखील भाग घेतला होता.(Photos-Official Instagram account)
-
अशा नेगी- छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो 'पवित्रा रिश्ता'मध्ये अशाने महत्वाची भूमिका साकारली होती. अशाने 'खतरों के खिलाड़ी'च्या ६व्या सीजनमध्ये भाग घेतला होता. या सीजनमध्ये रिद्धि डोगरा, हर्षद अरोड़ा, सना खान आणि रश्मि देसाई देखील स्टंट्स परफॉर्म करताना दिसले होते.(Photos-Official Instagram account)
-
ऐश्वर्या सखूजा-ऐश्वर्याने 'खतरों के खिलाड़ी'च्या ७व्या सीजनमध्ये भाग घेतला होता. या सीजनचा विजेता सिद्धार्थ शुक्ला होता जो 'बिग बॉस १३' सीजनचा पण विजेता आहे. या सीजनमध्ये अभिनेत्री माही विज पण सामील होती. (Photos-Official Instagram account)
-
टीना दत्ता- 'खतरों के खिलाड़ी' सीजन ७ मध्ये टीना दत्ता पण कठीण स्टंट्स परफॉर्म करताना दिसली. तिने ऐश्वर्या सखूजाला बरोबरची टक्कर दिली होती. मात्र ती हा सीजन जिंकू शकली नाही. (Photos-Official Instagram account)
-
हिना खान – 'खतरों के खिलाड़ी ८' मध्ये हिना खानने गर्ल पवरचा नारा लावत जोरदार कामगिरी दाखवली होती. तिने केलेल्या स्टंटने तिचा चाहतावर्ग अजून वाढला आहे. जरी तिने उत्तम स्टंट्स परफॉर्म केले असले तरी 'खतरों के खिलाड़ी ८'चा विजेता अभिनेता, डान्सर शांतनु माहेश्वरीने जिंकला होता. (Photos-Official Instagram account)
-
निया शर्मा – 'खतरों के खिलाड़ी ८' मध्ये हिना खान बरोबर भाग घेतला होता. निया हा सीजन जरी जिंकला नसली तरी 'खतरों के खिलाड़ी-मेड इन इंडिया' सीजन तिने आपल्या नवे केला होता.(Photos-Official Instagram account)
-
अविका गौर- 'खतरों के खिलाड़ी 9'मध्ये लोकप्रिय अभिनेत्री अविका गौर कठीण स्टंट्स परफॉर्म करताना दिसली.मात्र प्रचंड घाबरल्याने ती या शोमधून लवकर बाहेर पडली. अविका गौर बरोबर या सीजनमध्ये रिद्धिमा पंडित देखील स्टंट्स परफॉर्म करतानात दिसली होती. (Photos-Official Instagram account)
छोट्या पडद्यावरील सोज्वळ सुनांचा डॅशिंग अंदाज, ‘खतरों के खिलाड़ी’मध्ये ‘या’ अभिनेत्रींचे धाडसी स्टंट
या लोकप्रिय अभिनेत्रींनी केले होते ‘खतरों के खिलाडी’मध्ये कठीण स्टंट्स परफॉर्म
Web Title: Divyanka tripathi to hina khan these are list of television bhaus who performed dare devil stunts aad