• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sanjay dutt turns 60 rare photos munna bhai actor prp

Sanjay Dutt Birthday: पाहा बॉलिवूडच्या खलनायकाचे कधीही न पाहिलेले फोटोज

अभिनेता संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्ताने पाहूयात त्याचे कधीही न पाहिलेले फोटोज…

July 29, 2021 15:39 IST
Follow Us
  • sanjay-dutt-rare-photos
    1/10

    बॉलिवूडचा 'मुन्ना भाई' संजय दत्त आज आपला ६२ वा वाढदिवस साजरा करतोय. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या मल्टी स्टारर फिल्म 'कलंक' चित्रपटातून तो झळकला होता. त्यानंतर आता तो ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’, ‘शमशेरा’ आणि ‘पृथ्वीराज’ या चित्रपटातून तो पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर झळकणारेय.

  • 2/10

    संजय दत्तचा जन्म मुंबईमध्ये २९ जुलै १९५९ रोजी झाला. त्याचे पिता सुनिल दत्त हे त्यावेळचे बडे अभिनेते आणि आई नरगिस या अभिनेत्री होत्या. त्यामूळे अभिनयाचं बाळकडू लहानपणापासूनच मिळाल्यामुळे संजय दत्त सुद्धा अभिनयाकडे वळला आणि तो सुद्धा सुपरस्टार बनण्याचे स्वप्न पाहू लागला.

  • 3/10

    संजय दत्त याची बहिण प्रिया दत्त प्रिया ही सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणेच राजकारणात आहे. प्रिया दत्तने एक बहिण म्हणून संजय दत्तच्या अनेक कठिण प्रसंगी त्याचं मनोबळ वाढवलंय.

  • 4/10

    संजयने अभिनय करण्याचा निर्णय घेतल्यावर वडील सुनील दत्त यांनी त्याला चांगलं प्रशिक्षण दिलं. त्याच्याकडून चांगली मेहनत करवून घेतली. पुरेशी तयारी झाल्याची खात्री पटल्यावर 'रॉकी' सिनेमात संजयला हिरो म्हणून घेण्याचा निर्णय झाला.

  • 5/10

    नगरिस यांना आपल्या मुलाचा पहिला चित्रपट 'रॉकी' पहायचा होता. पण त्या पाहू शकल्या नाहीत. पहिल्या चित्रपटाच्या प्रीमियरच्या केवळ ३ दिवस आधी ३ मे १९८१ ला नर्गिस यांच निधन झालं. त्यामुळे संजय दत्तला मोठ्या दुःखाचा सामना करावा लागला होता.

  • 6/10

    'रॉकी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरूवात केली. त्यानंतर त्याने १९८२ साली 'मैं आवारा हूं' आणि १९८३ साली सगळ्यात जास्त कमाई करून दिलेल्या 'विधाता' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवले.

  • 7/10

    त्यानंतर १९९० मध्ये 'सडक', 'साजन' आणि 'खलनायक' या चित्रपटातून संजय दत्तने त्याच्या यशाची घोडदौड सुरूच ठेवली.

  • 8/10

    'रॉकी'नंतर अनेक चित्रपटात ‘चॉकलेट बॉय’च्या चौकटीतून बाहेर पडत राकट आणि तापट स्वभावाच्या गॅंगस्टरच्याही भूमिका त्याने प्रभावीपणे साकारल्या.

  • 9/10

    या प्रकणात संजयला काही दिवस तुरुंगवास भोगावा लागला. एक वर्ष जामिनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा एकदा १९९४ च्या जुलैमध्ये संजयला तुरुंगात जावं लागलं. यावेळी संज दत्तला थेट कुख्यात गुंड, भयंकर आरोपींना ज्या ठिकाणी ठेवलं जातं त्या अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.

  • 10/10

    चित्रपटाच्या सेटवर रक्ताने भरलेल्या बनियानमध्ये संजय दत्त…फिल्म डिव्हिजनच्या डॉक्युमेंटरीमध्ये एका प्रसंगात लहानगा संजू लाजला की कॅमेऱ्याकडे पाठ फिरवायचा. पण आज याच संजूबाबानं कॅमेऱ्यापुढे राहून बॉलिवूडचा 'मुन्नाभाई' बनला. (All Photo: Indian Express))

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Sanjay dutt turns 60 rare photos munna bhai actor prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.