Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood celebs react on afghanistan kabul situation kangana ranaut bhumi pednekar kpw

 “माणुसकीची लाज वाटतेय”; अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर सेलिब्रिटींनी व्यक्त केल्या भावना

अफगाणिस्तानमधून समोर येणाऱ्या या परिस्थितीवर बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील चिंता व्यक्त केलीय.

August 17, 2021 10:12 IST
Follow Us
  • अफगाणिस्तानात पुन्हा एकदा जवळपास २० वर्षांनंतर तालिबाननं सत्ता स्थापन केली आहे. अफगाणिस्तान सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले आहेत. सत्तांतरण केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देखील देश सोडला आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये भायानक चित्र आहे. खास करून काबुलमधून समोर येणारे फोटो आणि व्हिडीओ ह्रदय पिळवटून टाकणारे आहेत. इथल्या नागरिकांना काही करून काबूल सोडायचं आहे. मात्र विमानतळांवर प्रचंड गर्दीचे झाल्याने विमानसेवा देखील बंद करण्यात आलीय.अफगाणिस्तानमधून समोर येणाऱ्या या परिस्थितीवर बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील चिंता व्यक्त केलीय.
    1/10

    अफगाणिस्तानात पुन्हा एकदा जवळपास २० वर्षांनंतर तालिबाननं सत्ता स्थापन केली आहे. अफगाणिस्तान सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले आहेत. सत्तांतरण केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देखील देश सोडला आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये भायानक चित्र आहे. खास करून काबुलमधून समोर येणारे फोटो आणि व्हिडीओ ह्रदय पिळवटून टाकणारे आहेत. इथल्या नागरिकांना काही करून काबूल सोडायचं आहे. मात्र विमानतळांवर प्रचंड गर्दीचे झाल्याने विमानसेवा देखील बंद करण्यात आलीय.अफगाणिस्तानमधून समोर येणाऱ्या या परिस्थितीवर बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील चिंता व्यक्त केलीय.

  • 2/10

    अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअऱ केलीय. "जगभरातील महिला वेतन समानतेसाठी लढत असताना, अफगाणिस्तानातील महिलांना विकलं जात आहे. इथल्या महिला आणि अल्पसंख्यांकाची स्थिती अत्यंत वाईट आहे" असं म्हणत रियाने अफगाणिस्तानमधील महिलांबद्दल दु:ख व्यक्त केलंय.

  • 3/10

    आलिया भटची आई आणि अभिनेत्री सोनी राजदान यांनी ट्वीट करत भावना व्यक्त केल्या आहेत. यात त्या म्हणाल्या, "एक देश स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना दुसऱ्या एका देशाने आपलं स्वतंत्र्य गमावलं. काय जग आहे" असं ट्वीट सोनी राजदान यांनी केलंय.

  • 4/10

    अभिनेत्री भूमि पेडणेकरने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत हे संपूर्ण चित्र काळजाला भिडणारं आहे. असं म्हंटलं आहे.

  • 5/10

    अभिनेता करण टॅकरने देखील इन्स्टा स्टोरीवरून संताप व्यक्त केलाय. यात तो म्हणाला, "अफगाणिस्तानमधील महिलांची स्थिती पाहून माणूसकीची लाज वाटू लागली आहे. जग शांत बसून फक्त तमाश पाहतंय."

  • 6/10

    तर प्रत्येक घडामोंडीवर आपलं परखडमत मांडणाऱ्या कंगनाने देखील अफगाणिस्तानमधील भीषण परिस्थितीवर भाष्य केलंय. ती म्हणाली, "आज आपण हे निमूटपणे पाहत आहोत पण उद्या हे आपल्यासोबतही होवू शकतं." पुढे तिने लिहिलं, "हे खरंय की अफगाणिस्तानला आपली गरज आहे. पॅलेस्टाइन मुसलमानांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करणारे ड्रामेबाज आज अफगाणिस्तान मुसलमानांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त करत आहेत. मी आपल्या सरकारचे आभार मानते की त्यांनी सीएए लागू केलं. ज्यामुळे सर्व हिंदू, शिख, जैन, इसाई आणि पारसी अशा धर्मींयांसोबतच शेजारी राष्ट्रांमधील इतर धर्मीयांच्या लोकांना आधार मिळू शकेल." असं कंगना म्हणाली

  • 7/10

    तर आणखी एका पोस्टमध्ये कंगना म्हणाली, "तुम्हाला माहित आहे का इस्लामआधी अफगाणिस्तान हे हिंदू आणि बौद्ध राष्ट्रा होतं." तसंच दुसऱ्या पोस्टमध्ये तिने भारत सरकारचे आभार मानले आहेत.भारत सरकारन अफगाणिस्तानमधून सर्व हिंदूना देशात परत आणणार ही बातमी तिने शेअर केलीय.

  • 8/10

    तर दिग्दर्शक शेखर करपूर यांनी एक ट्वीट करत अफगाणिस्तानमधील नागिरिकांसाठी दुख: व्यक्त केलंय. या ट्वीटमध्ये ते म्हणाले, "अफगाणिस्तानमधील जनतेसाठी देवाकडे खास प्रार्थना. परकिय शक्तींच्या विध्वंसक वृत्तीमुळे देश उद्धवस्त झाला आहे." असं ते म्हणाले आहेत.

  • 9/10

    फिल्म मेकर आणि अभिनेत्री टिस्का चोप्राने काबुलमधील बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. पोस्टमध्ये तिने लिहिलं, " काबुल खूपच सुंदर होतं. मी तिथेच मोठी झाले. मात्र सध्या जे घडतंय ते पाहून ह्रदय पिळवटून निघत आहे. एका सुंदर मात्र दु:खात असलेल्या देशासाठी प्रार्थना करतेय." असं ट्वीट टिस्काने केलंय.

  • 10/10

    तर अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विटरवर अफगाणिस्तानमधील विमानतळावरील एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत विमानतळावर देश सोडू पाहणाऱ्या लोकांची गर्दी दिसतेय. हा व्हिडीओ शेअर करत स्वराने फक्त तुटलेल्या हार्टचे इमोजी दिले आहेत.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Film

Web Title: Bollywood celebs react on afghanistan kabul situation kangana ranaut bhumi pednekar kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.