• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi celebrities with no brothers and sisters in real life

Raksha Bandhan 2021: खऱ्या आयुष्यात ‘या’ कलाकारांना नाहीत बहीण-भाऊ

बहीण आणि भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन…या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते. यात सेलिब्रिटी सुद्धा मागे नाहीत. पण काही सेलिब्रिटी असेही आहेत ज्यांना कुणी भाऊ-बहिण नाहीत. आजच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने जाणून घेऊयात भाऊ-बहिणी नसलेले मराठी कलाकार…

August 22, 2021 12:12 IST
Follow Us
  • Marathi Celebrity No Brothers and sisters-1
    1/9

    सखी गोखले : अभिनेते मोहन गोखले आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांची ही एकुलती एक मुलगी आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून सखी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि घराघरांतील अविभाज्य भाग बनली. अवघ्या सहा वर्षाची असतानाच सखीने वडीलांना गमावलंय. तिला कोणतेही भावंडं नसल्याने तिच्या आईलाच ती वडील, बहीण आणि भाऊ मानते.

  • 2/9

    स्वप्नील जोशी : मराठी सिनेसृष्टीतील 'चॉकलेट बॉय' म्हणून परिचित असलेला स्वप्नील जोशी हा सुद्धा एकुलता एक आहे. त्यामूळे त्याला सुद्धा कुणी भावंडं नसल्यामुळे रक्षाबंधनचा सण थोडा फिकाच जातो. स्वप्नील हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध आणि नावाजलेला अभिनेता समजला जातो. त्याचबरोबर स्वप्नीलला एक रोमॅण्टिक अभिनेता समजलं जातं. अनेक तरुणी स्वप्नीलवर फिदा आहेत.

  • 3/9

    सई ताम्हणकर : मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री आहे. मराठीतील बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सई ताम्हणकर मुळची सांगलीची आहे. सई आपल्या आई-वडिलांची एकुलती एक लेक आहे.

  • 4/9

    आदिनाथ कोठारे – मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांचा एकुलता एक मुलगा आदिनाथ आहे. ‘माझा छकुला’ या सिनेमातून त्याने बालवयातच अभिनयाला सुरूवात केली होती. त्यानंतर त्याने रूपरी पडद्यावर एन्ट्री घेतली ती 2010 मध्ये आलेल्या ‘वेड लावी जीवा’ या सिनेमातून… त्यानंतर आदिनाथने ‘दुभंग’, ‘सतरंगी रे’, ‘झपाटलेला २’, ‘हॅलो नंदन’, ‘अनवट’, ‘इश्ववाला लव्ह’, ‘प्रेमासाठी कमींग सून’, ‘अवताराची गोष्ट’ या सिनेमांमध्ये काम केलंय.

  • 5/9

    श्रिया पिळगावकर: अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया यांची ही एकुलती एक लेक आहे. आईवडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत श्रियाने सुद्धा अभिनयात आपलं नशीब आजमावलं. मराठीतच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतसुद्धा श्रिया आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे. शाहरुख खान सोबत 'फॅन' या सिनेमात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत ती दिसली होती.

  • 6/9

    केतकी माटेगावकर : 'सारेगमप लिटील चॅम्प्स'मधून प्रसिद्धीझोतात आलेली आणि आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील झालेली गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगांवकर ही आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. केतकीला सख्खी भावंड नाहीत. मात्र तिच्या चुलत बहीण-भावंडांसोबत तिचं स्ट्राँग बाँडिंग वेळोवेळी दिसून येत असतं.

  • 7/9

    गिरीजा ओक : अभिनेत्री गिरीजा ओक ही सुद्धा एकुलती एकच असल्यामुळे रक्षाबंधन थोड्या फिक्या पद्धतीने साजरा होतो. तिला सख्खे बहीणभावंड नाहीत. अभिनेते गिरीश ओक यांची ती कन्या आहे. वडिलांप्रमाणेच गिरीजासुद्धा रंगभूमीवर रमते. गिरीजाचेही लग्न झाले असून तिला एक मुलगा आहे. कबीर हे तिच्या मुलाचे नाव आहे.

  • 8/9

    क्षिती जोग : मराठी आणि हिंदीतील वेगवेगळ्या मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री क्षिती जोग हिला सुद्धा सख्खे बहीण-भावंड नाहीत. क्षिती ही प्रसिद्ध अभिनेते अनंत जोग यांची कन्या आहे. मराठी अभिनेता हेमंत ढोमेसोबत क्षिती विवाहबद्ध झाली आहे.

  • 9/9

    मृण्मयी लागू: अभिनेत्री रिमा लागू आणि अभिनेते विवेक लागू यांची ही एकुलती एक कन्या आहे. तिला सुद्धा कुणी भांवंडं नाहीत. तिने काही ठराविक हिंदी आणि मराठी सिनेमांत काम केलं आहे. 'मुक्काम पोस्ट लंडन', 'सातच्या आत घरात', 'बयो', 'दोघांत तिसरा आता सगळं विसरा' या मराठी सिनेमांमध्ये ती झळकली. 'बयो' या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार मिळाला आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi celebrities with no brothers and sisters in real life

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.