• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nagarjuna akkineni know about his personal life marriage and love affairs prp

Nagarjuna Birthday Spl: सुपरस्टार दग्गुबाती वेंकटेशच्या बहिणीसोबत केलं होतं लग्न; पण ‘या’ अभिनेत्रीमुळे तुटला संसार

साउथचा सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन ६२ वर्षाचा झाला आहे. त्याचा जन्म 29 ऑगस्ट 1959 मध्ये झाला होता. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल….

August 29, 2021 14:04 IST
Follow Us
  • साउथ सिनेमाचा सुपरस्टार अभिनेता अक्कीनेनी नागार्जुनने साउथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुनने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच स्वत:ला सिद्ध केलं नाही तर बॉलिवूडमध्ये देखील त्याने चाहत्यांची पसंती मिळवलीय. बॉलिवूडमध्येही त्याची मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे.. चित्रपटांबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत राहिला आहे.
    1/15

    साउथ सिनेमाचा सुपरस्टार अभिनेता अक्कीनेनी नागार्जुनने साउथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुनने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच स्वत:ला सिद्ध केलं नाही तर बॉलिवूडमध्ये देखील त्याने चाहत्यांची पसंती मिळवलीय. बॉलिवूडमध्येही त्याची मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे.. चित्रपटांबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत राहिला आहे.

  • 2/15

    नागार्जुनचा जन्म याच दिवशी 1959 मध्ये चेन्नई (तामिळनाडू) येथे झाला. त्याचे वडील नागेश्वर राव अक्किनेनी हे देखील दक्षिणेचे सुप्रसिद्ध अभिनेते होते.

  • 3/15

    नागार्जुनने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट 'सुदिगुंडलू' होता.

  • 4/15

    मुख्य अभिनेता म्हणून नागार्जुनने 1986 मध्ये 'विक्रम' या तेलुगु चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तो केवळ अभिनेताच नाही तर निर्माता, टीव्ही प्रस्तुतकर्ता आणि व्यावसायिक देखील आहे.

  • 5/15

    नागार्जुनने आपल्या कारकिर्दीची सुरवातही केली नव्हती त्यावेळी त्याने 1984 मध्ये लक्ष्मी दग्गुबतीशी पहिलं लग्न केले. लक्ष्मी ही फिल्ममेकर डी रामानायडू यांची मुलगी आणि सुपरस्टार दग्गुबती वेंकटेश यांची बहीण आहे. या नात्यातून नागार्जुन त्यांचे मेहुणे बनले.

  • 6/15

    नागार्जुन आणि लक्ष्मी यांचा संसार जास्त काळ चालला नाही. काही वर्षातंच हे दोघे एकमेकांसापसून वेगळे झाले. 1990 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यांना नागा चैतन्य नावाचा मुलगा देखील आहे.

  • 7/15

    नागार्जुन आणि लक्ष्मी या दोघांनी घटस्फोट घेतला असला तरी त्यानंतरही त्यांच्यातील मैत्रीचं नातं कायम राहिलं.

  • 8/15

    नागार्जुन आणि लक्ष्मी यांच्या घटस्फोटाचं कारण अभिनेत्री अमला असल्याचं सांगितलं जातं. कारण नागार्जून आणि अक्कीनेनी यांनी बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर त्यांचं अफेअर सुरू झालं होतं.

  • 9/15

    जेव्हा पहिली पत्नी लक्ष्मीला नागार्जुन आणि अमला यांच्यातील जवळीकीबद्दल कळलं तेव्हा घरात त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली. शेवटी दोघेही या नात्याला कंटाळले आणि ते तोडणे योग्य वाटले.

  • 10/15

    लक्ष्मीपासून विभक्त झाल्यानंतर अक्किनेनी नागार्जुन १९९२ मध्ये अभिनेत्री अमला अक्किनेनी हिच्यासोबतचं नात आणखी घट्ट होत गेलं.

  • 11/15

    त्यावेळी अमला तिच्या यशाच्या शिखरावर पोहोचली होती. 5 चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर दोघे एकमेकांना जवळून ओळखू लागले.

  • 12/15

    अमेरिकेच्या प्रवासादरम्यान नागार्जूनने अमलाला प्रपोज केलं होतं आणि दोघांनी जून 1992 मध्ये लग्न केलं.

  • 13/15

    त्यानंतर दोघांना 1994 मध्ये मुलगा अखिल झाला.

  • 14/15

    अखिल अक्किनेनी हा साउथ फिल्म इंडस्ट्रीमधला अभिनेता देखील आहे. आजकाल तो त्याच्या 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' चित्रपटासाठी चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या 8 ऑक्टोबर रोजी रिलीज होईल. यामध्ये त्याच्यासोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे.

  • 15/15

    नागार्जुन आणि तब्बू दोघेही चित्रपटाच्या सेटवर एकमेकांमध्ये गुंतले होते. दोघांचं नातं अनेक वर्षे टिकलं. पण नागार्जूनने त्याचं लग्न वाचवण्यासाठी तब्बूशी लग्न केलं नाही. तब्बूने आजही कुणाशी लग्न न करणं पसंत केलंय.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Nagarjuna akkineni know about his personal life marriage and love affairs prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.