-
टीव्ही अभिनेता राम कपूर आज त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करतोय. राम कपूरचा जन्म नवी दिल्लीत झाला होता. टीव्ही मालिकांच्या माध्यमातून त्याला जितकी लोकप्रियता मिळाली ती त्याला चित्रपटातून मिळाली नाही.
-
भूमिका छोटी असो वा मोठी, त्याने सर्वच भूमिका अत्यंत सुंदरतेने साकारल्या आहेत. 'बडे अच्छे लगते हैं' मालिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरूवात केली. या मालिकेतून तो रातोरात स्टार बनला.
-
भूमिका छोटी असो वा मोठी, त्याने सर्वच भूमिका अत्यंत सुंदरतेने साकारल्या आहेत. 'बडे अच्छे लगते हैं' मालिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरूवात केली. या मालिकेतून तो रातोरात स्टार बनला.
-
राम कपूरने या मालिकेमध्ये वयाच्या चाळीशीत एक इंटीमेट सीन दिला होता. १७ मिनिटांचा हा लिपलॉक सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मालिकेतील या सीनने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला होता.
-
अभिनेता राम कपूरने छोट्या पडद्यावर अनेक अभिनेत्रींसोबत काम केलंय. पण 'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेत को-स्टार साक्षी तन्वरसोबतची त्याची केमिस्ट्री ही काही निराळीच होती. 'बडे अच्छे लगते हैं' मालिकेतील ही जोडी छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरली होती.
-
टीव्ही स्क्रीनवर राम-साक्षीचे रोमॅण्टिक सीन्स बरेच गाजले आहेत. त्यातील एका इंटीमेट सीन्समध्ये दोघांनी लिपलॉक सीन दिला होता. या दोघांची पॅशनेट किस पाहून संपूर्ण देशात खळबळ माजली होती.
-
या इंटीमेट सीनपूर्वी टीव्हीवर इतका बोल्डनेस कधीच झळकला नव्हता. टीव्हीवर सर्वाधिक वेळ चाललेल्या किसिंग सीनमध्ये हा इंटीमेट सीन मोजला जातो.
-
१२ मार्च २०१२ रोजी राम-साक्षीचा हा किसिंग सीन टीव्हीवर ऑन-एअर झाला होता. त्यानंतर इंटरनेटच्या जाळ्यात या सीनची जी चर्चा रंगली, त्याची कल्पना राम-साक्षीने आयुष्यात कधी केलीच नसेल.
-
हा सीन टीव्हीवर ऑन-एअर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माध्यमांमध्ये राम-साक्षीच्या बातम्या झळकू लागल्या होत्या.
-
राम कपूर आणि साक्षी तन्वरने दिलेल्या या इंटीमेट सीनची चर्चा तर रंगली. मात्र, याचा अर्थ असा होत नाही की, त्यांचं कौतुक केलं जात होतं. दोघांच्या चर्चांमध्ये काही ट्रोलर्सचा देखील समावेश होता.
-
सोशल मीडियावर काही जणांनी या इंटीमेट सीनची खिल्ली उडवली. तर काही जणांनी दोघांना बॉडीशेम केलं होतं. कारण काहीही असो, पण राम-साक्षीच्या या इंटीमेट सीनमुळे सोशल मीडियावरचा पारा मात्र वाढला होता.
-
राम-साक्षीच्या या इंटीमेट सीनमुळे मालिकेची टीआरपी रेट देखील उसळी घेऊ लागला. त्याआधीच कोणत्याच टीव्ही मालिकामध्ये इतका इंटीमेट सीन दाखवला नव्हता.
-
कदाचित याच कारणामुळे राम-साक्षीचा हा १७ मिनिटांचा लिपलॉक सीन चर्चेत आला. राम आणि साक्षी या दोघांना टीव्हीवरील सगळ्यात ऑयकॉनिक जोडींमध्ये मोजलं जातं.
-
या मालिकेतच्या त्या दिवशीच्या १७ मिनिटांच्या एपिसोडमध्ये फक्त लव्ह मेकिंग सीन्स दाखवण्यात आले होते.
-
यात कधी ते दोघे एकमेकांना रोमॅण्टिक होत चिडवताना दिसून येत होते, तर कधी किस करताना दिसून येत होते. या एपिसोडमध्ये राम-साक्षीने चक्क दोन वेळा किसिंग सीन्स दिले होते.
Ram Kapoor Birthday: साक्षी तन्वरसोबतचा ‘तो’ लिपलॉक सीन झाला होता व्हायरल
टीव्ही अभिनेता राम कपूर आज त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करतोय. ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकामधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता राम कपूर एका इंटीमेट सीनमुळे चर्चेत आला होता.
Web Title: Ram kapoor birthday bade achhe lagte hain 17 minute intimate scene liplock created stir prp