• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rhea chakraborty to bharti singh list of bollywood celebrities under ncb scanner in drugs case nrp

सारा अली खान ते आर्यन खान, ‘या’ सेलिब्रेटींची ड्रग्जप्रकरणी चौकशी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ड्रग्स कनेक्शनबद्दल एनसीबीने अनेक मोठमोठ्या कलाकारांची चौकशी केली होती.

October 4, 2021 11:38 IST
Follow Us
  • अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापेमारी केल्याच्या बातमीनंतर सर्वांचे धाबे दणाणले आहेत. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे नाव समोर आले आहे.
    1/13

    अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापेमारी केल्याच्या बातमीनंतर सर्वांचे धाबे दणाणले आहेत. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे नाव समोर आले आहे.

  • 2/13

    ड्रग्सप्रकरणी आर्यन खानचे नाव आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. यामुळे शाहरुख खानच्या सिनेसृष्टीतील प्रतिमेला धक्का लागू शकतो, असेही बोललं जात आहे.

  • 3/13

    मात्र यापूर्वीही अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींची नाव ड्रग्स केसप्रकरणी समोर आली होती. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ड्रग्स कनेक्शनबद्दल एनसीबीने अनेक मोठमोठ्या कलाकारांची चौकशी केली होती.

  • 4/13

    अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्जदेखील जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान यावेळी क्रूझवर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील उपस्थित होता.

  • 5/13

    एनसीबी चौकशीनंतर आर्यन खान, अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना एनसीबीने अटक केली आहे. तर इतर पाच जणांची अद्याप चौकशी सुरु आहे.

  • 6/13

    आर्यन खानला क्रूझवरील पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं. पार्टीत जाण्यासाठी त्याला कोणतेही पैसे भरावे लागले नव्हते. चौकशीदरम्यान आर्यन खानने कार्यक्रमाच्या आयोजकांना आपल्या नावाचा वापर करत इतरांना आमंत्रण दिलं असा दावा केला आहे. या प्रकरणी एनसीबीने आर्यनचा फोन जप्त केला असून त्यातील चॅट्सची चौकशी सुरु केली आहे.

  • 7/13

    सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीला बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनबद्दलची माहिती मिळाली होती. त्यानंतर सर्वात आधी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ही चौकशीच्या फेऱ्यात अडकली होती. रियाला याप्रकरणी एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा मिळाली आहे. रियाने सुशांतला ड्रग्स दिले, असा आरोप तिच्यावर होता.

  • 8/13

    बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिचे नाव ड्रग्स कनेक्शनप्रकरणी समोर आले होते. सारा ही सुशांतच्या फॉर्महाऊसवरील अनेक पार्ट्यांमध्ये सहभागी असायची. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा वापर केला जात होता. याप्रकरणी साराची चौकशी केली असता, तिने ड्रग्ज घेतल्याला स्पष्टपणे नकार दिला होता.

  • 9/13

    व्हॉट्सअॅप चॅटमुळे श्रद्धा कपूरही एनसीबीच्या रडारवर होती. श्रद्धा आणि जया शाहच्या व्हॉट्सअॅप चॅटमुळे ती CBD Oil वापरत असल्याचे समोर आले होते. CBD Oil हे ड्रग्सच्या श्रेणीत येते. यानंतर NCB श्रद्धाची चौकशी केली. त्यावेळी श्रद्धाने मी CBD Oil फक्त बाह्य वापरासाठी करते.

  • 10/13

    अर्जुन रामपाल देखील ड्रगच्या प्रकरणात अडकला होता. अर्जुनचा साथीदार गॅब्रिएला डिमिट्रिएड्सचा भाऊ ड्रग्स प्रकरणात आरोपी आढळला होता. यामुळेच एनसीबीने अर्जुनच्या घरावरही छापा टाकला. त्या ठिकाणाहून एनसीबीला अर्जुनच्या विरोधात काही पुरावे मिळाले होते. वैद्यकीय गरजांसाठी अर्जुनने ड्रग्स वापरल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट केले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी पुन्हा अर्जुनचे नाव ड्रग्स प्रकरणात पुन्हा पुढे आले होते. त्यावेळी त्याने मोठे स्पष्टीकरण दिले.

  • 11/13

    रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान अभिनेत्री रकुलप्रीत हिचे नाव घेतले होते. त्याआधारे एनसीबीने रकुलला समन्स पाठवण्यात आले होते. रकुलने चौकशीदरम्यान हे सर्व आरोप फेटाळले होते. इतकंच नव्हे तर रकुलचे नाव एका बड्या दाक्षिणात्य सुपरस्टारसोबतच ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी घेण्यात आले होते.

  • 12/13

    लाफ्टर क्विन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्यावरही ड्रग्ज प्रकरणी सहभाग असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर एनसीबीने दोघांना अटक केली. चौकशीदरम्यान भारती सिंगने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली होती. काही काळानंतर त्याची जामिनावर सुटका झाली.

  • 13/13

    विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचेही नाव चर्चेत आले होते. दीपिका आणि तिच्या मॅनेजरच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये ड्रग्जशी संबंधित संभाषण सापडले होते. दीपिकाने तिचे हे संभाषण मान्य केले असलं तरी मात्र तो काही इतर गोष्टींसाठी कोड नेम आहे असे सांगितले होते.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Rhea chakraborty to bharti singh list of bollywood celebrities under ncb scanner in drugs case nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.