• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. full timeline of shah rukh khan son aryan khan alleged involvement in drugs case to granted bail nrp

आर्यन खानला जामीन, गोसावी कोठडीत; गेल्या २५ दिवसांत नेमकं काय घडलं?

या संपूर्ण प्रकरणात गेल्या २५ दिवसात नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Updated: October 28, 2021 18:21 IST
Follow Us
  • गेल्या महिनापासून बी टाऊनमध्ये फक्त आणि फक्त खान कुटुंबाची चर्चा सुरु आहे. प्रवासी जहाजावर अंमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केली.
    1/21

    गेल्या महिनापासून बी टाऊनमध्ये फक्त आणि फक्त खान कुटुंबाची चर्चा सुरु आहे. प्रवासी जहाजावर अंमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केली.

  • 2/21

    यानंतर एनसीबी, कॉर्डेलिया क्रूझ, आर्यन खान, समीर वानखेडे, आर्थर रोड जेल, बॉलिवूड, ड्रग्स यासह विविध विषयांवरील चर्चांना उधाण आले. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील आर्थर जेलमध्ये कैद करण्यात आले.

  • 3/21

    त्यामुळे गेल्या २५ दिवसांपासून आर्यनचा मुक्काम हा ‘मन्नत’ऐवजी आर्थर रोड जेलमध्ये होता.

  • 4/21

    मात्र अखेर २५ दिवसानंतर याप्रकरणी आर्यनला कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

  • 5/21

    या संपूर्ण प्रकरणात गेल्या २५ दिवसात नेमकं काय घडलं? याचा संक्षिप्त आढावा घेऊया.

  • 6/21

    २ ऑक्टोबर, शनिवार : केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रविवारी पहाटेच्या सुमारास मुंबईच्या समुद्रात कार्डेलिया क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्जदेखील जप्त केले. त्यासोबत एनसीबीने १० जणांना ताब्यात घेतले.

  • 7/21

    ३ ऑक्टोबर, रविवार : एनसीबीने यावेळी ८ जणांना अटक केली. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा यांचा समावेश होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ४ ऑक्टोबरपर्यंत या सर्वांना एनसीबी कोठडी सुनावली.

  • 8/21

    ४ ऑक्टोबर, सोमवार : या सर्व आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आर्यनसह आठ जणांना प्रवासी जहाजावर अंमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली. ही हायप्रोफाईल केस सोडवण्यासाठी नामांकित वकील सतीश मानशिंदेंची नियुक्ती करण्यात आली.

  • 9/21

    ५ ऑक्टोबर, मंगळवार : याप्रकरणी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली. त्या सर्वांना १४ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली.

  • 10/21

    ७ ऑक्टोबर, गुरुवार : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अंतरिम जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. गुरुवारी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात अटक केलेल्या आठही जणांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली.

  • 11/21

    ८ ऑक्टोबर, शुक्रवार : : आर्यन खानच्या जामीन अर्जावर शुक्रवारी मुंबईतील किल्ला न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

  • 12/21

    ९ ऑक्टोबर, शनिवार : या सर्व घडामोडीनंतर आर्यन खानची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. त्याच्यासोबत इतर पाच आरोपींना आर्थर रोड जेलमधील बरॅक क्रमांक १ मध्ये ठेवण्यात आली.

  • ११ ऑक्टोबर, सोमवार : यानंतर आर्यनच्या वकिलांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत मुंबईच्या विशेष न्यायालयात धाव घेतली. यानंतर विशेष न्यायालयाने १४ ऑक्टोबरला याप्रकरणी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला.
  • 13/21

    १३ ऑक्टोबर, बुधवार : आर्यनच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयाने गुरुवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगिती दिली.

  • 14/21

    १४ ऑक्टोबर, गुरुवार : याप्रकरणी एनसीबीच्या छापेमारीतील साक्षीदार किरण गोसावी याच्याविरोधात पुणे शहर पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली. तर विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जामीन अर्जावर २० ऑक्टोबरपर्यंत आपला आदेश राखून ठेवला. त्यामुळे त्याला पुन्हा तुरुंगात रात्र काढावी लागली.

  • 15/21

    २० ऑक्टोबर, बुधवार : विशेष NDPS न्यायालयाने आर्यन खान आणि इतर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.

  • 16/21

    २१ ऑक्टोबर, गुरुवार : शाहरुख खानने मुलगा आर्यन खानची भेट घेतली. तर आर्यन खान आणि इतरांच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

  • 17/21

    २४ ऑक्टोबर, रविवार : मुंबईतील आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी किरण गोसावी हा साक्षीदार बनला आहे. गोसावीवर त्याच्या अंगरक्षक प्रभाकर साईलने शाहरुखकडून कोट्यवधीची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी साईलही साक्षीदार आहे.

  • 18/21

    २६ ऑक्टोबर, मंगळवार : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब केली.

  • 19/21

    २८ ऑक्टोबर, गुरुवार : मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन मंजूर केला आहे.

  • 20/21

    २८ ऑक्टोबर, गुरुवार : तर किरण गोसावीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Full timeline of shah rukh khan son aryan khan alleged involvement in drugs case to granted bail nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.