Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. indian army day special bollywood movies based on indian army soldiers bravery kak

Indian Army Day: ‘बॉर्डर’ ते ‘शेरशाह’… लष्कराची शौर्यगाथा सांगणारे चित्रपट

१५ जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो. याचनिमित्ताने जवानांच्या शौर्याची कथा सांगणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांवर नजर टाकूया.

January 15, 2022 11:41 IST
Follow Us
  • १५ जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो. सीमेवर सैनिक आपल्या प्राणांची बाजी लावून देशाचे रक्षण करत असतात. भारतीय सैन्य दलाकडून लढल्या गेलेल्या युद्धांवर आधारित चित्रपट बॉलिवूडमध्ये बनवले गेले. याच चित्रपटांबद्दल आज माहिती घेणार आहोत.
    1/15

    १५ जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो. सीमेवर सैनिक आपल्या प्राणांची बाजी लावून देशाचे रक्षण करत असतात. भारतीय सैन्य दलाकडून लढल्या गेलेल्या युद्धांवर आधारित चित्रपट बॉलिवूडमध्ये बनवले गेले. याच चित्रपटांबद्दल आज माहिती घेणार आहोत.

  • 2/15

    शेरशाह – २०२१ मधील सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे शेरशाह. परमवीर चक्राने सन्मानित कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनपटलावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.

  • 3/15

    १९९९ साली भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धावर आधारित हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित करण्यात आला होता. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शूरवीराची कहाणी या चित्रपटातून दाखविण्यात आली आहे.

  • 4/15

    उरी : द सर्जिकल स्ट्राइक – दहशतवाद्यांकडून उरी येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्य दलाकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्यात आलं होतं. ‘उरी’ हा चित्रपट याच घटनेवर आधारित आहे.

  • 5/15

    या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, यामी गौतम, परेश रावल, मोहित रैना या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. ‘हाऊ इज द जोश’ हा चित्रपटातील डायलॉग लोकप्रिय आहे.

  • 6/15

    बॉर्डर – जे.पी.दत्ता निर्मित आणि दिग्दर्शित ‘बॉर्डर’ हा चित्रपट १९९७ साली प्रदर्शित झाला होता. भारत-पाकिस्तानमधील युद्धावर आधारित हा चित्रपट आहे.

  • 7/15

    भारत-पाकिस्तानमधील युद्धावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात सनी देओल, अक्षय खन्ना, जॉकी श्रॉफ अशी स्टार कास्ट आहे. या चित्रपटातील गाणी अजूनही लोकप्रिय आहेत.

  • 8/15

    टॅन्गो चार्ली – २००५ साली ‘टॅन्गो चार्ली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

  • 9/15

    या चित्रपटात अजय देवगण, बॉबी देओल, संजय दत्त आणि सुनील शेट्टी या कलाकारांनी काम केले आहे.

  • 10/15

    लक्ष्य – फरहान अख्तर दिग्दर्शित ‘लक्ष्य’ हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हृतिक रोशन, अमिताभ बच्चन, प्रिती झिंटा या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

  • 11/15

    पाकिस्तानी सैनिकांना पराभूत करण्यासाठी भारतीय जवानांना प्रेरित करणाऱ्या लेफ्टनंट करण शेरगील यांच्याभोवती या चित्रपटाची कथा फिरते.

  • 12/15

    एलओसी कारगिल – भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धावर आधारित हा चित्रपट आहे.

  • 13/15

    या चित्रपटात संजय दत्त, अजय देवगण आणि अभिषेक बच्चन या कलाकारांनी काम केलं आहे.

  • 14/15

    भुज : द प्राइड ऑफ इंडिया – १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धावर आधारित हा चित्रपट आहे.

  • 15/15

    भारतीय हवाई दलाच्या स्क्वाड्रन विजय कर्णिक आणि देशाच्या भुज या भागातील ३०० गुजराती महिलांच्या साहसाची कहाणी या चित्रपटातून दाखविण्यात आली आहे.

TOPICS
बॉलिवूड न्यूजBollywood Newsभारतीय सैन्यदलIndian |ArmyमनोरंजनEntertainment

Web Title: Indian army day special bollywood movies based on indian army soldiers bravery kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.