-
बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली.
-
त्यामुळे जोनस कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा जोनस कुटुंबिय चाहत्यांना गुडन्यूज देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
-
प्रियांकाची जाऊबाई सोफी टर्नर ही गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सोफी टर्नरचे बेबी बंप प्लाँनट करतानाचे अनेक फोटो समोर आले आहेत.
-
stjonaschile या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सोफीचे काही फोटो शेअर करण्यात आले आहे. यात सोफी आणि जो हे दोघेही समुद्राच्या लाटांचा आनंद घेताना दिसत आहे.
-
यात सोफी ही गरोदर असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे अनेक फोटोत ती बेबी बंप प्लाँनट करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
-
त्यांचे हे फोटो मियामीच्या समुद्रकिनाऱ्यावरील आहेत. यातील सर्व फोटोत सोफी ही बिकनी आणि सनग्लासमध्ये दिसत आहे.
-
तिचे बेबी बंपमधील फोटो पाहिल्यानंतर अनेक चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहे.
-
काही दिवसांपासून सोफी गरोदर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. काही दिवसांपूर्वी लंच डेटवर गेलेल्या सोफीचे बेबी बंपसह अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा सोफीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
-
पण जोनस किंवा टर्नर कुटुंबातील अद्याप कोणीही तिच्या गरोदरपणाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
-
सोफी टर्नरने याआधीही पहिल्या मुलाच्या गरोदरपणाची कोणतीही घोषणा केली नव्हती. पण या गुडन्यूजमुळे जोनस कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
-
सोफी टर्नर आणि जो जोनास २०१६ पासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर वर्षभरातच त्या दोघांचा साखरपुडा झाला होता.
-
सोफीने २०१९ मध्ये जो जोनाससोबत लग्न केले होते. जुलै २००० मध्ये त्या दोघांना मुलगी झाली. तिचे विला असे नाव ठेवण्यात आले आहे. मात्र तिचा एकही फोटो अद्याप समोर आलेला नाही.
-
सोफी ही प्रियंका चोप्राची जाऊ आहे. सोफीचा नवरा जो हा प्रियंकाचा पती निक जोनासचा भाऊ आहे
प्रियांका चोप्राची जाऊबाई सोफी टर्नर प्रेग्नंट, बेबी बंपसोबतचे फोटो व्हायरल
प्रियांकाची जाऊबाई सोफी टर्नर ही गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Web Title: Priyanka chopra sister law sophie turner pregnant showed off her bare belly in a tiny bikini photos viral nrp