-
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बॉलिवूडमधील पहिलावहिला ‘झुंड’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
-
झोपडपट्टीतील मुलांसाठी ‘स्लम सॉकर’ ही संस्था उभारून त्याद्वारे त्यांना फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण देऊन त्यांचं भवितव्य घडवण्याचं काम प्रशिक्षक विजय बरसे गेली कित्येक वर्ष करत आहेत.
-
‘झुंड’ या चित्रपटातून विजय बरसे यांचा जीवनप्रवास दाखविण्यात आला आहे.
-
या चित्रपटात बिग बींनी विजय बरसे पडद्यावर साकारले आहेत.
-
अमिताभ बच्चन यांनी उत्कृष्टरित्या साकारलेल्या ‘झुंड’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
-
याआधीही चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड कलाकार पडद्यावर प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसले आहेत.
-
अभिनेता आर माधवनचा ‘साला खडूस’ हा चित्रपट बॉक्सिंग या खेळावर आधारित आहे.
-
यात त्याने खडूस बॉक्सिंग प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे.
-
बॉलिवूड किंग शाहरुख खानचा २००७ साली प्रदर्शित झालेला ‘चक दे इंडिया’ हा चित्रपट खूप गाजला.
-
या चित्रपटात शाहरुख हॉकी प्रशिक्षक ‘कबीर खान’च्या भूमिकेत दिसला होता.
-
शाहरुख खानचा ‘सत्तर सिर्फ सत्तर मिनिट है तुम्हारे पास…’ हा चित्रपटातील डायलॉग खूप गाजला होता.
-
भारतीय महिला कुस्तीपट्टू गीता आणि बबिता फोगट यांच्या संघर्षावर आधारित ‘दंगल’ चित्रपट सुपरहिट ठरला होता.
-
‘दंगल’ चित्रपटात अभिनेता आमिर खानने गीता आणि बबिता यांना कुस्तीचे प्रशिक्षण देणाऱ्या वडिलांची भूमिका साकारली होती.
-
बॅडमिंटनपट्टू साइना नेहवालच्या जीवनावर आधारित ‘साइना’ हा चित्रपट २०२१ साली प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा साइना नेहवाल तर अभिनेता मानव कौल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसले.
-
२००५ साली प्रदर्शित झालेला ‘इकबाल’ हा चित्रपट क्रिकेटवर आधारित आहे.
-
या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत तर नसरुद्दीन शाह त्याच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : आयएमडीबी)
Photos : ‘झुंड’ मधील बिग बी ते ‘चक दे इंडिया’ मधील शाहरुख खान…’या’ कलाकारांनी साकारलेल्या प्रशिक्षकाच्या भूमिका ठरल्या हिट
‘झुंड’ या चित्रपटात बिग बींनी फुटबॉल प्रशिक्षक विजय बरसे यांची भूमिका साकारली आहे.
Web Title: Nagraj manjule jhund movie from amitabh bacchan to shah rukh khan know the actors who played on screen sports coach role kak