-
दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ हा चित्रपट २५ मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटाद्वारे राजमौली पुन्हा एकदा ब्लॉक्सऑफिसवर धमाका करणार असल्याची चर्चा आहे.
-
ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चाहत्यांना ‘आरआरआर’ चित्रपटाबद्दल उत्सुकता होती.
-
करोना संकंटामुळे अनेकदा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.
-
अखेर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
‘आरआरआर’ हा बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही तगडी आहे.
-
दाक्षिणात्य अभिनेता राम चरण या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.
-
‘अल्लूरी सीताराम राजू’ हे पात्र साकारताना तो दिसणार आहे.
-
‘आरआरआर’ चित्रपटासाठी राम चरणने ४५ करोड रुपये मानधन घेतलं आहे.
-
राम चरणसोबत अभिनेता ज्यूनिअर एनटीआरही चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.
-
चित्रपटात ज्यूनिअर एनटीआरने कोमाराम भीम हे पात्र साकारलं आहे.
-
या भूमिकेसाठी त्याने ४५ करोड रुपये मानधन घेतल्याची माहिती आहे.
-
‘आरआरआर’ चित्रपटात बॉलिवूड कलाकारही झळकले आहेत.
-
अभिनेता अजय देवगण पहिल्यांदाच दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार आहे.
-
या चित्रपटासाठी त्याने २५ कोटी रूपये मानधन घेतलं आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील या चित्रपटात महत्त्वाचं पात्र साकारताना दिसणार आहे.
-
प्रेक्षकांना पुन्हा एकदा आलियाच्या अभिनयाची जादू पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आलियाने ‘सिता’ हे पात्र साकारलं आहे.
-
हे पात्र साकारण्यासाठी आलियाने ९ कोटी घेतल्याची माहिती आहे. (सर्व फोटो : आरआरआर / इन्स्टाग्राम)
Photos : राम चरण ते आलिया भट्ट…’आरआरआर’ चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाचा आकडा पाहून थक्क व्हाल
दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ हा चित्रपट २५ मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
Web Title: Rrr movie from alia bhatt to ram charan know the fees charged by the actors for the ss rajmouli blockbuster film photos kak