-
अभिनेत्री दीपिका पदुकोण बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
-
दीपिकाचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
नुकतंच दीपिकाने तिच्या चाहत्यांनी काढलेले काही पोर्टेटचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
चित्रपटांतून दीपिकाने साकारलेल्या विविध भूमिकांचे आर्ट चाहत्यांनी साकारले आहेत.
-
“टॅग केलेल्या पोस्ट पाहत असताना मला हे सोनं सापडलं”, अशा आशयाचं कॅप्शन दीपिकाने या पोस्टला दिलं आहे.
-
हे फॅन आर्ट रणवीर सिंगला देखील आवडलं असून या पोस्टवर त्याने ‘ब्युटीफुल’ अशी कमेंट करत दीपिकाच्या चाहत्यांचं कौतुक केलं आहे.
-
‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात दीपिकाने साकारलेल्या ‘मस्तानी’चे चाहत्याने केलेले आर्ट.
-
‘पद्मावत’ चित्रपटातील दीपिकाची ‘राणी पद्मावती’ ही भूमिका खूपच गाजली होती.
-
‘राणी पद्मावती’चं चाहत्यानं साकारलेलं आर्ट. (सर्व फोटो : दीपिका पदुकोण/ इन्स्टाग्राम)
Photos : दीपिकाने शेअर केले Fan Art Photos; पोस्टवर रणवीरने केलेली कमेंट ठरतेय चर्चेचा विषय, म्हणाला…
दीपिकाने चाहत्यांनी काढलेले काही पोर्टेटचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
Web Title: Bollywood actor ranveer singh praising fan art photos shared by actress deepika padukon kak