-
बॉलिवूडमधील चर्चेत असलेली आलिया-रणबीर जोडी १५ एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकणार आहे.
-
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
आलिया-रणबीर गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
-
मुंबईतील ‘आरके हाऊस’मध्ये आलिया आणि रणबीर लग्नाच्या बेडीत अडकून त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत.
-
आलिया सोबत रिलेशनशिपमध्ये येण्याअगोदर रणबीर कपूरचं नाव बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं.
-
केवळ रणबीरच नाही तर आलियाच्या अफेयरच्या देखील चर्चा रंगल्या होत्या.
-
२०१२ साली ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
यावेळी आलिया अली दादरकरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं गेलं होतं.
-
आलिया आणि अली दादरकर एकमेकांना ओळखत असून लहानपणापासून त्यांची मैत्री आहे.
-
एका मुलाखतीदरम्यान आलियाने तिच्या पहिल्या बॉयफ्रेण्डबद्दल खुलासा केला होता.
-
अरसलान असं तिच्या पहिल्या बॉयफ्रेण्डचं नाव होतं. “अरसलान खूप हट्टी होता. मी फक्त जीन्स आणि ड्रेस घालावे अशी त्याची इच्छा होती. मी आजही स्नॅपचॅटवर त्याला फॉलो करते.”, असं आलियाने मुलाखतीत सांगितलं होतं.
-
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबतही आलियाचं नाव जोडलं गेलं होतं.
-
‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ चित्रपटानंतर आलिया आणि सिद्धार्थला अनेक वेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं.
-
त्यामुळे ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु नंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले.
-
सिद्धार्थसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आलियाचं नाव हाईक मेसेंजरचे संस्थापक केविन मित्तलसोबत जोडलं गेलं होतं. या दोघांमधील मैत्री आजही कायम आहे.
-
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनसोबत देखील आलियाच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
या दोघांनीही अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे.
-
परंतु एका कार्यक्रमादरम्यान रिलेशनशिपमध्ये नसल्याचा खुलासा आलिया आणि वरुणने केला होता. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)
Photos : ‘या’ अभिनेत्यांसह रंगल्या आलियाच्या अफेयरच्या चर्चा; पहिल्या बॉयफ्रेण्डला अजूनही करते सोशल मीडियावर फॉलो
केवळ रणबीरच नाही तर आलियाच्या अफेयरच्या देखील चर्चा रंगल्या होत्या.
Web Title: Bollywood couple alia bhatt ranbir kapoor wedding know about her boyfriend relationship affairs viral photos kak