-
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मिलिंद शिंदे यांनी आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने प्रत्येक भूमिकेची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली.
-
‘तू तिथे मी’ या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष गाजली होती.
-
लवकरच मिलिंद शिंदे छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
-
झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेत ते महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.
-
‘देवमाणूस’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलं.
-
या मालिकेच्या अफाट लोकप्रियतेमुळेच मालिकेचं दुसरं पर्वदेखील प्रेक्षकांच्या भेटीस आलं.
-
पहिल्या पर्वाप्रमाणेच या पर्वानेदेखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे.
-
नुकतंच मालिकेत डॉक्टर अजित आणि डिम्पल यांचा लग्नसोहळा पार पडला आहे.
-
‘देवमाणूस’ मालिकेच्या पहिल्या पर्वात अजितला पोलीस इन्स्पेक्टर दिव्या सिंग लग्नाच्या मंडपातून खेचून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाताना प्रेक्षकांनी पाहिलं होतं.
-
या पर्वात अजितला कोणाचाच धाक नाही असं वाटतं असतानाच लवकरच प्रेक्षकांना मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
-
‘देवमाणूस’ या मालिकेत एका रंजक वळणावर मिलिंद शिंदेंची एन्ट्री होणार आहे.
-
या मालिकेत ते ‘मार्तंड जामकर’ या भूमिकेत दिसणार आहेत.
-
या भूमिकेबद्दल बोलताना मिलिंद शिंदे म्हणाले, “देवमाणूस ही मालिका खूपच लोकप्रिय आहे. या मालिकेतील अजितकुमारची व्यक्तिरेखा खूप दमदार आहे. या पर्वात मार्तंड जामकर ही महत्वपूर्ण भूमिका मी साकारतोय याचा मला खूप आनंद आहे. याआधी देखील प्रेक्षकांनी माझ्या सर्व भूमिकांना डोक्यावर उचलून धरलं आहे. त्यामुळे ही भूमिका देखील त्यांच्या लक्षात राहील आणि त्यांना आवडेल अशी मला खात्री आहे. अजितकुमार आणि मार्तंड यांची जुगलबंदी प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळेल.”
-
मार्तंड जामकारमुळे अजितकुमारसमोर कुठलं नवीन आव्हान उभं राहणार? अजितकुमारचा चांगुलपणाचा मुखवटा फाडून त्याचा खरा चेहरा गावकऱ्यांसमोर येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिकेत पुढे पाहायला मिळतील.
-
‘देवमाणूस’ या मालिकेत मिलिंद शिंदेंना ‘मार्तंड जामकर’ ही भूमिका साकारताना पाहणं औस्त्युक्याच ठरणार आहे.
Photos : मिलिंद शिंदे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरून येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ मालिकेत साकारणार महत्वपूर्ण भूमिका
लवकरच मिलिंद शिंदे छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Web Title: Marathi actor milind shinde to be play important role in famous zee marathi serial devmanus photos kak