Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sachin tendulkar daughter going to do bollywood debut soon see her glamorous photos mrj

Photos: सारा तेंडुलकर बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज? आघाडीच्या अभिनेत्रींनाही लाजवेलं असं आहे सौंदर्य

सोशल मीडियावर सध्या सारा तेंडुलकरच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा होताना दिसत आहे.

Updated: April 25, 2022 14:55 IST
Follow Us
  • मागच्या काही काळापासून सेलिब्रेटी किड्सच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहेत. आगामी काळात बरेच सेलिब्रेटी किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.
    1/12

    मागच्या काही काळापासून सेलिब्रेटी किड्सच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहेत. आगामी काळात बरेच सेलिब्रेटी किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

  • 2/12

    या यादीत आता प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरच्या नावाचाही समावेश झाला आहे. साराचे चाहते तिच्या बॉलिवूड पदार्पणाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

  • 3/12

    चित्रपटामध्ये विशेष रुची असलेली सारा लवकरच बॉलिवूड पदार्पण करू शकते असा अंदाज आता एका बॉलिवूड रिपोर्टनं वर्तवला आहे.

  • 4/12

    बॉलिवूड लाइफनं दिलेल्या वृत्तानुसार, जवळच्या सूत्रांनी सारा आगामी काळात बॉलिवूड पदार्पण करणार असल्याची माहिती दिली आहे.

  • 5/12

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सारा तेंडुलकरला अभिनय क्षेत्रात बरीच रुची आहे. एवढंच नाही तर तिनं अभिनयाचं प्रशिक्षणही घेतलं आहे.’

  • 6/12

    सारा काही नामांकित ब्रँडच्या जाहिराती देखील करते. सारा सध्या लंडन युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यास करत आहे. मात्र २४ वर्षीय साराला ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर करायचं आहे.

  • 7/12

    सूत्रांच्या माहितीनुसार, ‘साराच्या अभिनयाबाबत फारसं कोणाला माहीत नाही कारण याआधी कोणी तिला अभिनय करताना पाहिलेलं नाही. त्यामुळे तिला अभिनय करताना पाहून अनेकांना धक्का बसू शकतो.

  • 8/12

    सारा तेंडुलकर खूपच टॅलेंटेड आहे आणि तिला तिच्या पालकांचा पूर्ण पाठिंबा आहे.सारा एक प्रोफेशनल मॉडेल असून तिचे फोटो सोशल मीडियावर बरेच चर्चेतही असतात.

  • 9/12

    सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या साराचे इन्स्टाग्रामवर १८ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

  • 10/12

    दरम्यान काही वर्षांपूर्वी सारा तेंडुलकर शाहिद कपूरसोबत बॉलिवूड पदार्पण करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यावेळी सचिन तेंडुलकरनं स्वतःच या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

  • 11/12

    त्यावेळी सचिन म्हणाला होता, “सारा सध्या तिचं शिक्षण घेत आहे आणि आयुष्य एन्जॉय करत आहे. सध्या तरी तिचा बॉलिवूड पदार्पणाचा कोणताही विचार नाही.”

  • 12/12

    आता तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र याची पुष्टी स्वतः सारानं अद्याप केलेली नाही.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsसारा तेंडुलकरSara Tendulkar

Web Title: Sachin tendulkar daughter going to do bollywood debut soon see her glamorous photos mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.