Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kgf 2 rocking star yash gets reply from wife radhika pandit after six months of proposal know about their fimly love story photos kak

Photos : राधिकाला प्रपोज केल्यानंतर KGF च्या रॉकी भाईला सहा महिने पाहावी लागली होती वाट; रॉकिंग स्टार यशची फिल्मी लव्हस्टोरी

‘केजीएफ २’ चित्रपटात रॉकी भाईच्या भूमिकेत असलेल्या रॉकिंग स्टार यशची लव्हस्टोरीही फिल्मी आहे.

May 6, 2022 11:59 IST
Follow Us
  • kgf 2 star yash and radhika love story (4)
    1/27

    ‘केजीएफ २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही धुमाकूळ घालतोय. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक अजूनही चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.

  • 2/27

    या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत.

  • 3/27

    ‘केजीएफ २’ हा सर्वाधिक कमाई करणारा भारतातील चौथा चित्रपट ठरला आहे.

  • 4/27

    दाक्षिणात्य अभिनेता यश मुख्य भूमिकेत असलेल्या ‘केजीएफ २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चाहत्यांना चित्रपटाबद्दल उत्सुकता होती.

  • 5/27

    ‘केजीएफ’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.

  • 6/27

    रॉकिंग स्टार यशला या चित्रपटाने एक वेगळी ओळख मिळवून दिली.

  • 7/27

    ‘केजीएफ २’ चित्रपटप्रेमानेच रॉकी भाईची देखील चाहत्यांमध्ये क्रेझ आहे.

  • 8/27

    रॉकी भाई आणि त्याच्या गर्लफ्रेण्डची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

  • 9/27

    रॉकी भाईच्या भूमिकेत असलेल्या रॉकिंग स्टार यशची लव्हस्टोरीही फिल्मी आहे.

  • 10/27

    यश दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

  • 11/27

    यशने २००८ साली ‘मोगीना मनसु’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

  • 12/27

    २०१६ मध्ये यशने राधिकासोबत लग्नगाठ बांधली.

  • 13/27

    यशची पत्नी राधिका पंडित एक अभिनेत्री आहे.

  • 14/27

    यश आणि राधिका ‘नंदगोकुला’ या टीव्ही शोच्या निमित्ताने २००४ साली पहिल्यांदा एकमेकांना भेटले.

  • 15/27

    नंतर त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. दोघांमधील मैत्री घट्ट होत गेली आणि मग या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.

  • 16/27

    यशने राधिकाला एकदम हटके स्टाइलने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रपोज केलं होतं.

  • 17/27

    व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी राधिका आई-वडिलांसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेली होती.

  • 18/27

    यशला हे कळताच त्याने राधिकाच्या गाडीमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देणारं कार्ड आणि गिफ्ट ठेवलं होतं.

  • 19/27

    गिफ्टवर यशने त्याचं नाव देखील टाकलं नव्हतं. परंतु राधिकाला हे गिफ्ट यशनेच गाडीत ठेवलं असणार हे लक्षात आलं.

  • 20/27

    यश आणि राधिका याबद्दल एकमेकांसोबत काहीही बोलले नाहीत.

  • 21/27

    नंतर काही दिवसांनी यशने राधिकाला फोन करून आपल्या मनातील भावना व्यक्त करत प्रपोज केलं.

  • 22/27

    मात्र तरीदेखील राधिका काहीच बोलली नाही. राधिकाच्या उत्तरासाठी यशला तब्बल सहा महिने वाट पाहावी लागली होती.

  • 23/27

    सहा महिन्यांनी राधिकाने यशला प्रेमाची कबुली दिली.

  • 24/27

    यश आणि राधिका पती-पत्नीसोबतच एकमेकांचे चांगले मित्रदेखील आहेत.

  • 25/27

    या दोघांना आयरा आणि याथर्व ही दोन मुले आहेत.

  • 26/27

    यश आपल्या कुटुंबासोबतचे खास क्षण सोशल मीडियावरून शेअर करत असतो.

  • 27/27

    (सर्व फोटो : यश, राधिका पंडित/ इन्स्टाग्राम)

TOPICS
केजीएफ २KGF 2बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kgf 2 rocking star yash gets reply from wife radhika pandit after six months of proposal know about their fimly love story photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.