-
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आज (१४ जून) रोजी दुसरी पुण्यतिथी आहे. सुशांतच्या निधनानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
-
यानिमित्ताने आपण त्याच्या आयुष्यातील अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या खूप कमी लोकांना माहिती आहेत.
-
सुशांतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी बिहारमधील पाटणात झाला. तो आपल्या ५ भावंडांपैकी सर्वात लहान होता. तो १२ वीला असतानाच त्याच्या आईचा मृत्यू झाला.
-
त्याने अभिनय क्षेत्रातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी इंजिनिअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडलं होतं.
-
सुशांतला नृत्याची प्रचंड आवड होती. त्यासाठी त्याने शैमक देवरकडून नृत्याचे धडे घेतले होते. तर बॅरी जॉन्स येथे अभिनयाचं शिक्षण घेतलं.
-
२००६ मध्ये कॉमनवेल्थ गेम्सच्या कार्यक्रमात ऐश्वर्या रायने डान्स केला. त्यावेळी सुशांतने गर्दीत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं.
-
सुशांतला खगोलशास्त्रात प्रचंड रस होता. इतकंच नाही सुशांतने चंद्रावर जमिनीचा एक तुकडा देखील विकत घेतला होता.
-
२०१३ मध्ये ‘काय पो छे’या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये प्रमुख अभिनेता म्हणून एन्ट्री केली. त्यापूर्वी २०१० मध्ये राझ या चित्रपटात सहकलाकार म्हणून भूमिका साकारली होती.
-
सुशांत राजपूत अमेरिकन सुपर मॉडेल केंडल जेनरसोबत मे २०१७ मध्ये वोगमध्ये (Vogue) झळकणारा एकमेवर बॉलिवूड कलाकार ठरला.
-
सुशांत इंटरनॅशनल लुनार लँड रजिस्ट्रीचा ३ वर्षे सदस्य होता. त्याने फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठाला भेट देण्याचंही ठरवलं होतं.
-
सुशांतला गिटार शिकण्याची फार उत्सुकता होती. मृत्यूच्या काही महिन्याआधी तो गिटार शिकत होता. यासाठी त्याने क्लासही लावला होता.
-
छोट्या पडद्यावरील ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेमध्ये सुशांतनं प्रीत जुनेजा ही भूमिका साकारली. या मालिकेनंतर सुशांतला ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेची ऑफर मिळाली.
-
पवित्र रिश्ता या मालिकेमुळे सुशांतला विशेष लोकप्रियता मिळाली.
-
‘केदारनाथ’, ‘छिछोरे’, ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘दिल बेचारा’, ‘पीके’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘काय पो छे’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये सुशांतने भूमिका साकारली.
-
त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.
बॅकग्राऊंड डान्सर ते प्रसिद्ध अभिनेता, जाणून घ्या सुशांत सिंग राजपूतविषयी ‘या’ खास १५ गोष्टी
सुशांतच्या निधनानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
Web Title: Sushant singh rajput death anniversary lesser known facts about sushant rajput life and his dreams nrp