-
प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांना सई, अश्वमी आणि सत्या या तीन मुलांव्यतिरिक्त आणखी एक मानसकन्या आहे. ती म्हणजे गौरी इंगवले.
-
गौरी इंगवले एक उत्तम अभिनेत्री आहे.
-
अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘कुटुंब’ या चित्रपटात गौरीने बालकलाकार म्हणून काम केलं.
-
‘पांघरुण’ या चित्रपटातून गौरीने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.
-
तिला या चित्रपटासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
-
आता महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का २’ चित्रपटात ती दिसणार आहे.
-
या चित्रपटामधील तिचा लूक समोर आला आहे.
-
गौरी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.
-
तिच्या सुंदर लूकला चाहत्यांची देखील पसंती मिळताना दिसते. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
Photos : ‘दे धक्का २’ चित्रपटात महेश मांजरेकर यांच्या लेकीची एण्ट्री, दिसते फारच सुंदर
अभिनेते महेश मांजरेकर यांची तिसरी लेक गौरी इंगवले तिच्या कामामुळे चर्चेत असते. महेश यांच्याच ‘पांघरुण’ चित्रपटामध्ये ती दिसली. आता आपल्या वडिलांचं दिग्दर्शन असलेल्या ‘दे धक्का २’ चित्रपटातही गौरी काम करताना दिसणार आहे.
Web Title: Mahesh manjrekar daughter gauri ingawale cute photos viral on instagram and she play role in father marathi movie de dhakka 2 kmd