-
अभिनेत्री सोनम कपूरच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम लंडनमध्ये थाटामाटात पार पडला.
-
या डोहाळे जेवणाचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
-
आता सोनमने स्वतः आपल्या डोहाळे जेवणाचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सोनम फारच सुंदर दिसत आहे.
-
तिने पती आनंद आहुजाबरोबर देखील एक फोटो शेअर केला आहे.
-
डोहाळे जेवणासाठी सोनमने गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता.
-
या ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत होती.
-
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेली सजावट आणि त्याचे फोटो देखील यामध्ये पाहायला मिळत आहेत.
-
सोनमने खास फोटो शेअर करत सगळ्यांचे आभार मानले आहेत.
-
Leo Kalyan या गायकाने या कार्यक्रमामध्ये सोनमचं सुपरहिट गाणं ‘मसककली मसककली’ गायलं होतं.
-
या गायकाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली.
-
सध्या ती पती आनंद आहुजाबरोबर लंडनमध्ये एकत्रित वेळ घालवताना दिसत आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
Photos : अजूनही डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातच रमलीय सोनम कपूर, अभिनेत्रीने मानले सगळ्यांचे आभार
अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. लंडनमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला तिच्या कुटुंबियांनी तसेच जवळच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. या सगळ्यांचे सोनमने आभार मानले आहेत.
Web Title: Actress sonam kapoor share her baby shower photos on instagram account her look viral on social media kmd