• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. birthday special mangesh desai played journalist role dharmveer movie shivsena leader sanjay raut eknath shinde rebel maharashtra political crisis photos kak

Birthday Special : ‘धर्मवीर’ चित्रपटात मंगेश देसाईंनी साकारलेला पत्रकार खऱ्या आयुष्यात कोण आहे माहितीये का?

‘धर्मवीर’ चित्रपटात मंगेश देसाईंनी साकारलेला आनंद दिघे यांची मुलाखत घेणारा एकमेव पत्रकार आज शिवसेनेचा खासदार आहे.

Updated: June 28, 2022 12:18 IST
Follow Us
  • Mangesh Desai Birthday Special Dhramveer movie journalist is sanjay raut in real
    1/21

    मराठी अभिनेते, निर्माते मंगेश देसाई यांचा आज वाढदिवस आहे.

  • 2/21

    अनेक मालिका, चित्रपटांतून आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

  • 3/21

    मराठी चित्रपटसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेते म्हणून मंगेश देसाईंकडे पाहिलं जातं.

  • 4/21

    विविधांगी भूमिकांमधून त्यांनी अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.

  • 5/21

    गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर’ या चित्रपटातून मंगेश देसाईंनी निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं.

  • 6/21

    महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीमुळे ‘धर्मवीर’ हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे.

  • 7/21

    चित्रपटाचे निर्माते असण्यासोबतच मंगेश देसाई यांनी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

  • 8/21

    ‘धर्मवीर’मध्ये त्यांनी साकारलेली पत्रकाराची भूमिका सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता लक्षवेधी ठरत आहे.

  • 9/21

    अगदी काही वेळासाठी पडद्यावर दिसणाऱ्या पत्रकाराची मात्र फार मोठी भूमिका आहे.

  • 10/21

    या पत्रकाराने घेतलेल्या मुलाखतीनंतर ‘गद्दारांना क्षमा नाही’ असा मथळा वर्तमानपत्रात छापून आला होता.

  • 11/21

    यामुळे आनंद दिघे यांच्यावर खटला भरवून त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता.

  • 12/21

    आनंद दिघेंच्या मृत्यूवरदेखील पत्रकाराने संशय व्यक्त केल्याचे चित्रपटात दाखवले आहे.

  • 13/21

    आनंद दिघे यांची मुलाखत घेणारा एकमेव पत्रकार दुसरा तिसरा कोणी नसून शिवसेनेचे खासदार आणि सामना वृत्तपत्राचे उपसंपादक संजय राऊत आहेत.

  • 14/21

    ‘धर्मवीर’ प्रदर्शित झाल्यानंतर संजय राऊत यांनी स्वत: याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना अनेकदा खुलासा केला आहे.

  • 15/21

    “आनंद दिघेंची मुलाखत मीच घेतली होती. मी त्यांच्यासोबत सहकारी म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. त्या मुलाखतीमुळे नंतर वादळ निर्माण झालं होतं”, असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

  • 16/21

    काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या मेळाव्यातही त्यांनी पुन्हा “धर्मवीर चित्रपटातील तो पत्रकार मीच आहे”, असं म्हटलं होतं.

  • 17/21

    संजय राऊत आता शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार आहेत.

  • 18/21

    ‘धर्मवीरम’ध्ये मंगेश देसाईंनी पत्रकाराची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे.

  • 19/21

    एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडामुळे ‘धर्मवीर’ चित्रपट आणि त्यातील पात्रांबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

  • 20/21

    त्यामुळेच मंगेश देसाईंनी साकारलेला पत्रकारही सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. (सर्व फोटो : मंगेश देसाई/ फेसबुक, इंडियन एक्सप्रेस)

  • 21/21

    (हेही वाचा : ‘धर्मवीर’ चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणारा अभिनेता सोशल मीडियावर चर्चेत; जाणून घ्या त्याच्याबद्दल)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actorsमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra Politics

Web Title: Birthday special mangesh desai played journalist role dharmveer movie shivsena leader sanjay raut eknath shinde rebel maharashtra political crisis photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.