• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. who is youtuber gaurav flying beast arrested for metro station birthday party dcp

मेट्रो स्टेशनवर वाढदिवस साजरा केल्यामुळे अटक झालेला यूट्यूबर गौरव तनेजा आहे तरी कोण? जाणून घ्या ‘या’ १० गोष्टी

Updated: July 10, 2022 14:16 IST
Follow Us
  • प्रसिद्ध YouTuber गौरव तनेजा Flying Beast या नावाने ओळखला जातो. गौरवला काल नोएडा सेक्टर ५१ मेट्रो स्टेशनवर वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता. त्याच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
    1/15

    प्रसिद्ध YouTuber गौरव तनेजा Flying Beast या नावाने ओळखला जातो. गौरवला काल नोएडा सेक्टर ५१ मेट्रो स्टेशनवर वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता. त्याच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

  • 2/15

    यादरम्यान त्याच्या चाहत्यांची तेथे एवढी गर्दी केली होती की, मेट्रो स्टेशनखाली गोंधळ उडाला. त्यामुळे मेट्रोखाली वाहतूक कोंडी झाली. मेट्रो कर्मचारी आणि प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले.

  • 3/15

    नोएडा पोलिसांनी पहिले गौरवला कलम १४४ चे उल्लंघन केल्याबद्दल ताब्यात घेतले, त्यानंतर त्याला २ तास कोठडीत ठेवल्यानंतर, तनेजाला नोएडा पोलिसांनी अटक केली.

  • 4/15

    तमेजला कलम ३४१ आणि १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी घेतल्याशिवाय सेलिब्रेशनसाठी जमावाला बोलावल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सेक्टर ४९ पोलीस स्टेशनने अटक केली होती.

  • 5/15

    गौरवची पत्नी रितू राठीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत सांगितले की तिने संपूर्ण मेट्रो बुक केली आहे जिथे ती गौरवचा वाढदिवस साजरा करणार आहे.

  • 6/15

    गौरव तनेजा हा माजी पायलट असल्याचा दावा करतो आणि तो न्यूट्रिशनिस्ट असल्याचा दावा करतो.

  • 7/15

    गौरव दिल्ली विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतल्याचा दावाही केला आहे.

  • 8/15

    गौरव हा IIT-KGP चा माजी विद्यार्थी असल्याचा दावा करतो जिथे त्याने सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले.

  • 9/15

    गौरवचे युट्युबवर ७.५८ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत तर इन्स्टाग्राम अकाऊंटवर ३.३ मिलीयन फॉलोवर्स आहेत.

  • 10/15

    गौरव तनेजा हा एअर एशिया या विमानसेवा कंपनीचा पायलट म्हणून कार्यरत होता आणि त्याने दावा केला होता की त्याने एका व्हिडीओद्वारे एअरलाइनमध्ये झालेल्या नियमांच्या उल्लंघनाचा व्हिडीओ शेअर केल्यामुळे त्याला निलंबीत केले होते. हा व्हिडीओ त्याने २०२० मध्ये शेअर केला होता.

  • 11/15

    गौरव तनेजाची पत्नी रितू राठी तनेजा ही देखील सोशल मीडिया इनफ्लुएंसर आणि पायलट आहे. ते दोघे २०१५ साली लग्न बंधनात अडकले आणि त्यांना दोन मुलं आहेत.

  • 12/15

    त्या दोघांनी ‘स्मार्ट जोडी’ या शोमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

  • 13/15

    गौरव तनेजा आणि रितू राठी यांचे तीन यूट्यूब चॅनेल आहेत. FitMuscle TV, Flying Beast आणि Rasbhari ke Papa.

  • 14/15

    गौरव आणि रितू हे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांना २०१९ साली सिंगापुरमध्ये भेटले होते.

  • 15/15

    तनेजाला यापूर्वी नोएडामधील वाढत्या करोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते, पण गौरवला आता जामिन मिळाल्याची बातमी समोर आली आहे. (All Photo Credit : Flying Beast Instagram/ Social Media)

TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsयुट्यूबYoutube

Web Title: Who is youtuber gaurav flying beast arrested for metro station birthday party dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.