-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.
-
सोनालीच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
-
सोनालीने आता इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पारंपरिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
-
नाकात नथ, पारंपरिक दागिने आणि पांढऱ्या रंगाची साडी परिधान करत सोनालीने फोटोशूट केलं.
-
सोनाली तिच्या ‘तमाशा live’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.
-
पारंपरिक साडी देखील सोनालीने या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानच परिधान केली होती.
-
सोनालीचा हा पारंपरिक लूक पाहता नेटकऱ्यांनी तिच्या मनमोहक सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
-
सोनालीने परिधान केलेल्या खणाच्या ब्लाऊजने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
(सर्व फोटो – इनस्टाग्राम)
Photos : साडी, नाकात नथ अन् पारंपरिक दागिने; सोनाली कुलकर्णीचं मनमोहक सौंदर्य
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वेगवेगळ्या लूकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसते. आता सोनालीने साडीमधील फोटो शेअर केले आहेत. तिच्या पारंपरिक लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Web Title: Marathi actress sonalee kulkarni saree look photos viral on social media kmd