-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
सोशल मीडियावर सतत सक्रिय असणारी प्राजक्ता तिच्या हटके लूकमुळे चर्चेत असते.
-
प्राजक्ताने आता साडी परिधान करत एक हटके फोटोशूट केलं.
-
या साडीवर इंग्रजी बातम्यांची प्रिंट दिसत आहे.
-
तसेच साडीमध्ये तिने दिलेल्य हटके पोझ विशेष लक्षवेधी ठरत आहेत.
-
या साडीतील काही खास फोटो शेअर करत तिने म्हटलं की, “आजच्या ठळक बातम्या-माळी टाईम्स. (आजचं कॅप्शन परवाच्या कमेंट्समधून ढापलेलं आहे. म्हणून बातम्या इंग्रजीतून असल्या तरी नाव-मथळा मराठीत आहे.)
-
प्राजक्ता माळीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
-
यावर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. ‘आजची ठळक बातमी खूपच आवडली’, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : साडीला नवा अन् हटके टच, प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ फोटोंची रंगतेय चर्चा
अभिनेत्री प्राजक्ता माळी हटके फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. आता देखील तिने बातम्यांची प्रिंट असलेली साडी परिधान करत फोटोशूट केलं. प्राजक्ताच्या या नव्या लूकवर एक नजर टाकूया.
Web Title: Prajakta mali wear news print saree and her different photoshoot goes viral on social media kmd