-
मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज २२ जुलैला करण्यात आली.
-
चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात.
-
या पुरस्कारांमध्ये यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाने पटकावला.
-
दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहिर झाला.
-
तसेच ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी गायक राहुल देशपांडे यांनी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार पटकावला.
-
त्याचबरोबरीने ‘मी वसंतराव’ चित्रपटातील ध्वनीसंयोजनासाठी अनमोल भावे यांना पुरस्कार जाहीर झाला.
-
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘फनरल’ या मराठी चित्रपटाने पटकावला.
-
अभिनेता अजय देवगणला ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहिर करण्यात आला.
-
उल्लेखनीय फिचर फिल्ममध्येही मराठी चित्रपटांनी बाजी मारली.
-
जून, गोदाकाठ, अवांछित या मराठी चित्रपटांना उल्लेखनीय फिचर फिल्म पुरस्कार जाहीर झाला.
-
अजय देवगणच्या ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाने दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले.
-
यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनीही आपलं स्थान कायम राखलं आहे.
६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदीसह मराठी चित्रपटांची बाजी, सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला अजय देवगण
मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज २२ जुलैला करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणची घोषणा करण्यात आली. याशिवाय मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
Web Title: 68th national film awards tanhaji the unsung warrior gosth eka paithanichi movie recreat history see more details kmd