-
अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kpoor) बहुचर्चित ‘शमशेरा’ (Shamshera) चित्रपट प्रदर्शित झाला.
-
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालणार असं बोललं जात होतं. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही.
-
‘शमशेरा’ला बॉक्स ऑफिसवर काहीसा थंड प्रतिसाद मिळाला.
-
‘शमशेरा’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १० कोटी रुपये कमाई केली.
-
ही कमाई इतर सुपरहिट चित्रपटांच्या तुलनेत फारच कमी आहे. विकेण्डला हा चित्रपट तुफान चालणार असा अंदाज होता.
-
मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. शनिवारी (२३ जुलै) देखील चित्रपटाने फक्त ९ ते १० कोटी रुपयांच्या घरात बॉक्स ऑफिसवर गल्ला जमावला.
-
तर रविवारी (२४ जुलै) या चित्रपटाने फक्त ११ कोटी रुपयांची बॉक्स ऑफिसवर कमाई केली.
-
आतापर्यंत या चित्रपटाने ४० कोटी रुपयांचा टप्पा देखील गाठला नाही.
रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’कडे प्रेक्षकांची पाठ, अवाढव्य खर्च करूनही सुपरफ्लॉप ठरला चित्रपट
गेल्या काही महिन्यांमध्ये बॉक्स ऑफिसवर हिंदी चित्रपट अपयशी ठरले. रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटाची झलक पाहून बॉलिवूडमध्ये निर्माण झालेली परिस्थिती आता बदलणार असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र या चित्रपटाच्या पदरी अपयश आलं आहे.
Web Title: Bollywood actor ranbir kapoor movie shamshera box office collection day 3 film flop kmd