• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor anupam kher shared post on kuch kuch hota hai movie memes photos kak

Photos : ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटावरील मीम्स पाहून अनुपम खेर यांनाही हसू आवरेना, पोस्ट शेअर करत म्हणाले…

अनुपम खेर यांनी चित्रपटातील एका सीनचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत पोस्ट लिहली आहे.

July 28, 2022 10:52 IST
Follow Us
  • anupam kher on kuch kuch hota hai memes
    1/15

    बॉलिवूडमधील दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते अनुपम खेर यांनी आजवर अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

  • 2/15

    ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘दिल’, ‘द काश्मीर फाईल्स’, ‘स्पेशल २६’, ‘हम आपके है कोन’ या सुपरहिट चित्रपटांतील त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.

  • 3/15

    दमदार अभिनयाने अनुपम खेर यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

  • 4/15

    त्यांच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है’.

  • 5/15

    या चित्रपटात त्यांनी राणी मुखर्जीचे वडील आणि प्राध्यापक मल्होत्रा ही भूमिका साकारली होती.

  • 6/15

    या चित्रपटातील मीम्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

  • 7/15

    हे मीम्स पाहून अनुपम खेर यांनाही हसू अनावर झाले. नुकतीच त्यांनी याबद्दल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे.

  • 8/15

    अनुपम खेर यांनी चित्रपटातील एका सीनचा फोटो पोस्ट केला आहे. मिस्टर म्हलोत्रा आणि मिस ब्रिगान्झा यांच्यामधील फोनवरील संवादाचा हा सीन आहे.

  • 9/15

    या फोटोमध्ये अनुपम खेर बेडवर झोपून मिस ब्रिगान्झा यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत.

  • 10/15

    “मिस्टर म्हलोत्रा आणि मिस ब्रिगान्झा यांच्यामधील फोनवरील संवादाचा हा सीन अगदी नेहमीच्या सीनप्रमाणे शूट होणार होता. पण सीन शूट करताना मी विविध पोझ देत शेवटी बेड वरून खाली पडलो आणि सेटवर एकच हशा पिकला. यामुळे सीनमध्ये रंजकता आली. या सीनवर इतके मीम्स बनतील हा विचारही मी केला नव्हता”, असं कॅप्शन त्यांनी पोस्टला दिलं आहे.

  • 11/15

    कॅप्शमध्ये अनुपम खेर यांनी हसण्याचे इमोजीही पोस्ट केले आहेत.

  • 12/15

    त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

  • 13/15

    अनुपम खेर ‘कागज’ या त्यांच्या आगामी चित्रपटामुळेही चर्चेत आहेत.

  • 14/15

    ‘इमर्जन्सी’ या कंगना रणौतच्या चित्रपटातही ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. (सर्व फोटो : अनुपम खेर/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : अरबाज खानपेक्षा २२ वर्ष लहान आहे त्याची गर्लफ्रेण्ड; सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकते मागे)

TOPICS
अनुपम खेरAnupam KherबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actor anupam kher shared post on kuch kuch hota hai movie memes photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.