-  

झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
 -  
या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात पाहुण्या म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली.
 -  
यावेळी त्यांना राज्यातील सत्तांतर, दिल्लीतील राजकारण यांसह अनेक कौटुंबिक प्रश्न विचारण्यात आले.
 -  
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणाऱ्या अभिनेता सुबोध भावेने सुप्रिया सुळेंना विविध प्रश्न विचारले. या दरम्यान सुप्रिया सुळेंना शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कमतरता जाणवते का? असा प्रश्न विचारला होता.
 -  
त्यावर त्या म्हणाल्या, “एखादा एवढा मोठा माणूस जेव्हा जातो तेव्हा कमतरता ही राहते. पण शेवटी माझं याबाबत वेगळं मत आहे. बाळासाहेबांनी त्यांचा उत्तराधिकारी हा हयात असतानाच कोण आहे हे सांगितलं होतं. तेव्हा उद्धव ठाकरे सर्वांना मान्य होते.”
 -  
“पण ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालो, त्यांच्यावर वार करुन बाळासाहेबांचा वारसा यावरुन जी काही ओढाताण झाली आहे ती महाराष्ट्रासाठीच नव्हे तर कोणत्याही पक्षासाठी योग्य नाही.” असेही त्यांनी म्हटलं.”
 -  
त्याचबरोबरीने सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी घडलेल्या सत्तांतराबद्दल विचारण्यात आलं.
 -  
यावेळी त्या म्हणाल्या, “खरंतर हे सांगणं थोडंस अवघड आहे. कारण सत्ता येते आणि जाते. हे मी माझ्या आयुष्यात अनेक वेळा पाहिलं आहे. आता महाराष्ट्राचे राजकारण हे महाराष्ट्रवाले करत नाहीत तर दिल्लीवाले करत आहेत. त्यामुळे दिल्लीवाल्यांची यंत्रणा महाराष्ट्रावर किंवा सरकारी यंत्रणेला भारी पडली.”
 -  
यापुढे सुबोध भावेने त्यांना लगेचच महाराष्ट्र दिल्लीतून चालवला जातो का? असा प्रश्न विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आजपर्यंत मला असं वाटत नव्हतं. पण हा नवा ट्रेंड आलाय.”
 -  
या कार्यक्रमात सुप्रिया शिंदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो दाखवण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या, “तुम्ही इतकं कमी बोलता की मला दडपण येतं. मी बोलतंच राहते.
 -  
“मी घरी खूप चिडवते कारण आता पवार विरुद्ध शिंदे होणार. कारण पवार माझे वडील आणि माझ्या आईचं आडनाव शिंदे. मी परवा दादालाही सांगितलं की, दादा आता किती मजा येणार ना, कारण पवार विरुद्ध शिंदे होणार. बाबा जिंकणार की आई हे काळच ठरवेल.”
 -  
‘महाराष्ट्रात सकाळचा शपथविधी झाला, तेव्हा अजित दादा आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली. जेव्हा अजित दादा आणि देवेंद्रजी घराबाहेर पडले, तेव्हा तुमच्या घरात वातावरण कसं होतं?’, असा प्रश्न यावेळी सुप्रिया सुळेंना विचारण्यात आले.
 -  
या प्रश्नावर मजेशीर उत्तर देत त्या म्हणाल्या, “तेव्हा मी झोपले होते.”
 -  
दरम्यान ‘बस बाई बस’चा सुप्रिया सुळे स्पेशल एपिसोड सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.
 
“दिल्लीवाल्यांची यंत्रणा महाराष्ट्रावर भारी” राजकीय घडामोडींबाबत सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची विधानं
झी मराठी वाहिनीवर ‘बस बाई बस’ हा नवा कार्यक्रम २९ जुलैपासून सर्वत्र प्रसारित झाला. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केलं.
Web Title: Zee marathi show bas bai bas politician supriya sule participate talk about cm eknath shinde uddhav thackeray and maharashtra politics kmd