-
विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते.
-
मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्यासोबत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी ही नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या जोडीला ऑनस्क्रीनसह ऑफस्क्रिनवरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले.
-
या दोघांची लव्हस्टोरी आणि लग्नाचा किस्सा त्याकाळात फार गाजला होता.
-
अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयामध्ये तब्बल १८ वर्षांचे अंतर आहे. मात्र त्यांच्या प्रेमात वयाचा अडसर कधीच आला नाही.
-
अशोक आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली होती.
-
निवेदिता यांच्या वडिलांनी आपल्या मुलीची ओळख अशोक सराफ यांच्यासोबत करुन दिली होती.
-
अशोक सराफ हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप कमी बोलताना दिसतात.
-
नुकतंच अशोक सराफ यांनी ते निवेदिताच्या प्रेमात कसे पडले, याचा खुलासा एका मुलाखतीदरम्यान केला.
-
“मी १९८८ मध्ये मामला पोरींचा हा चित्रपट करत होतो. त्या चित्रपटात माझ्यासोबत निवेदिताही होती.”
-
“मामला पोरींचा या चित्रपटात एकत्र काम करताना निवेदिताचं पॅकअप झाले.”
-
“ती माझ्याजवळ आली आणि तिने फार सहज पुन्हा भेटू, बाय असे म्हटले.”
-
“खरंतर त्यावेळी मला फार वाईट वाटले होते. पण मी ते चेहऱ्यावर कुठेही दिसू दिले नाही.”
-
“त्यावेळी ती दरवाजातून बाहेर पडत असताना माझ्या सहज मनात आलं की ही समोर असलेल्या दाराजवळ गेल्यानंतर आपल्याकडे नक्की वळून बघणार आणि तसंच झालं.”
-
त्यानंतर मला खात्री पटली की आमच्यात नक्कीच काहीतरी आहे, असे अशोक सराफ म्हणाले.
-
दरम्यान अशोक सराफ आणि निवेदिता यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले.
-
पण ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा चित्रपट त्यांच्यासाठी खास ठरला.
-
या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान त्या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
पण निवेदिता यांच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हते. ‘आपल्या मुलीने चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करू नये’, अशी तिच्या आईची इच्छा होती. त्यामुळे या लग्नाला चांगलाच विरोध झाला.
-
लग्नानंतर निवेदिता सराफ यांनी अभिनयातून ब्रेक घेतला. त्यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा अनिकेत सराफ याच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली.
-
तर अशोक सराफ यांनी अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रीत करत अनेक चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारल्या.
“दारातून वळून बघितलं तर…” निवेदितावरील प्रेमाची जाणीव कशी झाली?, अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयामध्ये तब्बल १८ वर्षांचे अंतर आहे.
Web Title: Veteran actor ashok saraf love story realized his love for with nivedita joshi nrp