-
मालिका आणि चित्रपट विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर.
-
‘रात्रीस खेळ चाले २’मध्ये तिने साकारलेली शेवंता या पात्राला तूफान लोकप्रियता मिळाली.
-
ती नेहमी हटके फोटोशूट करत नवीन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत त्यांना सरप्राईज देत असते.
-
नुकतेच तिने गोकुळाष्टमीनिमित्त एक फोटोशूट केलं आहे, त्यात ती आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या लुकमध्ये दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये गळ्यात फुलांचा हार, सोन्याचे दागिने, डोक्यावर फेटा अशी तिने भगवान कृष्णाची वेशभूषा आणि त्याच्या जवळ जाणारा मेकअप केला आहे.
-
तर तिच्या चेहऱ्यावरील हावभावही शांत आणि प्रसन्न असल्याचे दिसत आहे.
-
या सगळ्या फोटोंमध्ये तिने छान स्मितहास्य दिले आहे.
-
एका फोटोमध्ये तिने हातात बासरी धरली आहे.
-
तर दुसऱ्या फोटोत अपूर्वा ती बासरी वाजवताना दिसत आहे.
-
यातील एका फोटोत तिच्या पाठीमागे ब्रम्हांड आणि पुढ्यात लोण्याने भरलेलं मडकं पाहायला मिळत आहे. तसेच या फोटोत ती बसून विचार करताना दिसतेय.
-
तर एका फोटोत तिच्या हातात मोरपिस दिसत आहे.
-
तिचं हे फोटोशूट नेटकऱ्यांना प्रचंड आवडलं असून यासाठी तिचे कौतुक केले जात आहे.
सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर (इन्स्टाग्राम)
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, भगवान श्रीकृष्णाच्या लूकमधील फोटोंना मिळतेय पसंती
ती नेहमी हटके फोटोशूट करत नवीन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत त्यांना सरप्राईज देत असते. नुकतेच तिने गोकुळाष्टमीनिमित्त एक अनोखे फोटोशूट केले आहे.
Web Title: Actress apoorva nemalekar drew attention netizens liked her photos in sri krishnas look rnv