-
दोन वर्षाच्या खंडानंतर राज्यभर दहीहंडी उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.
-
अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांनी मेगा दहीहंडी कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.
-
विशेषतः मुंबई आणि ठाण्यात लाखोंची बक्षिसे ही पुन्हा एकदा दहीहंडी उत्सवाचे आकर्षण ठरले आहेत.
-
स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरु केलेली ठाणे टेंभीनाका येथील दहीहंडी सर्वाधिक चर्चेत असते. यावर्षी देखील या दहीहंडीचं उत्साहात आयोजन करण्यात आलं आहे.
-
यावर्षी देखील या दहीहंडीचं उत्साहात आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली.
-
यावेळी अभिनेत्री श्रद्धा कपूरही (Shraddha Kapoor) तिथे उपस्थित होती. इतकंच नव्हे तर तिने मराठीमध्ये उपस्थितांशी संवाद साधत सगळ्यांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या.
-
श्रद्धाने गोविंदा पथकांशी संवाद साधत त्यांना मराठीमध्ये दहीहंडीच्या सगळ्यांना शुभेच्छा असं म्हटलं. श्रद्धाचं मराठी ऐकून यावेळी सगळेच भारावून गेले.
-
शिवाय यावेळी श्रद्धा म्हणाली, “मुख्यंत्री एकनाथ शिंदे आपल्याबरोबर आहेत यापेक्षा जास्त आपल्याला काय पाहिजे. बरंच ऐकलं आहे दिघे साहेबांची हंडी खूप मोठी असते. आज मी ते पाहिलं. ही दहीहंडी खरंच खूप मोठी आहे.”
-
“तुम्ही मला एवढं प्रेम देता त्यासाठी मनापासून तुमची आभारी आहे. दहीहंडीच्या सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र.” (सर्व फोटो – ट्विटर)
Dahi Handi 2022 : ठाण्यात श्रद्धा कपूरकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक, मराठीमध्ये गोविंदा पथकांशी साधला संवाद
ठाणे टेंभीनाका येथील दहीहंडीला अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली होती. यावेळी तिने उपस्थितांशी मराठीमध्ये संवाद साधला.
Web Title: Cm eknath shinde shraddha kapoor thane tembhi naka dahi handi 2022 see more photos kmd