-
सध्या बॉलिवूड चित्रपटांबाबत बॉक्स ऑफिसवर वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.
-
बॉलिवूडमधील अगदी टॉपच्या कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले. ‘लाल सिंग चड्ढा’ सारख्या चित्रपटांचे शो देखील रद्द झाले.
-
एकीकडे हिंदी चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नसताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत.
-
‘चंद्रमुखी’, ‘टाइमपास ३’, ‘धर्मवीर – मुक्कामपोस्ट ठाणे’, ‘पावनखिंड’ सारखे चित्रपट बॉक्सऑफिसवर प्रचंड गाजले.
-
पण त्याचबरोबरीने अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘दगडी चाळ २’, ‘टकाटक २’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरु आहे.
-
२०१५मध्ये प्रदर्शित झालेला ‘दगडी चाळ’ चित्रपट सुपरहिट ठरला.
-
आता ७ वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यामध्ये चंद्रकांत कानसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ चित्रपट यशस्वी ठरला आहे.
-
‘दगडी चाळ २’ ३५० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. दहीहंडीच्या ऐनमोक्यावर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अवघ्या अवघ्या ३ दिवसांमध्येच चित्रपटाने दोन कोटींपेक्षा अधिक कमाई केली.
-
तर दुसरीकडे प्रथमेश परबची मुख्य भूमिका असलेला ‘टकाटक २’ चित्रपटालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
-
‘टकाटक २’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी २.११ कोटी रुपये इतपत कमाई केली आहे.
हिंदी चित्रपटांचे शो रद्द तर मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी, काही दिवसांमध्येच कमावले इतके कोटी
बॉलिवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असताना मराठी चित्रपट पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.
Web Title: Dagadi chawl 2 takatak 2 marathi movie more box office collection compare to bollywood movie see details kmd